Sunday, November 17, 2024
Homeराज्यआमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते बौद्धविहाराचे भूमिपूजन संपन्न...

आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते बौद्धविहाराचे भूमिपूजन संपन्न…

पारशिवनी – राजू कापसे

दिनांक ०८ ऑगस्ट २०२४ रोजी भारतरत्न डॉ. आंबेडकर सामजिक विकास योजना सन २०२२-२३अंतर्गत धम्मकेंद्र/वाचनालय, बौद्धविहार बांधकाम १ कोटी ४० लक्ष रुपयांचे भूमिपूजन रामटेकचे आमदार ॲड आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हर्षवर्धन निकोसे,शिवसेना पारशिवनी तालुका प्रमुख राजु भोस्कर, मिलिंद मेश्राम,हरिदास सांगोडे,राजकुमार खोब्रागडे उपस्थित होते.

पारशिवनी तालुक्यांतील ग्राम पंचायत आमडी येथे बौद्धविहार बांधकाम रु.२६ लक्ष, ग्राम पंचायत नयाकुंड येथे बौद्धविहार/वाचनालय बांधकाम रु ३० लक्ष, ग्राम पंचायत परसोडी येथे बौद्धविहार बांधकाम रु.२५ लक्ष, ग्राम पंचायत पारडी येथे बौद्धविहार बांधकाम रु.३० लक्ष, ग्राम पंचायत दहेगाव जोशी येथे बौद्धविहार बांधकाम रु.३०.लक्ष असे एकूण १ कोटी ४० लक्ष रुपयांचे भूमिपूजन करण्यात आले.

भूमिपूजन प्रसंगी ग्रापंचायत आमडी सरपंच इंद्रपाल मायवाडे, माजी सरपंच शुभांगीताई भोस्कर, उपसरपंच संतोष बसोले,अनिल बागडे, नरेंद्र चव्हाण, अनिल भुतांगे, वासुदेव लांजेवार, युवराज मेश्राम, नत्थु गडपायले, शिवराज मेश्राम, तुकाराम मोटघरे, प्रमोद बागडे, मिनल बागडे, विक्की चौहान,विमलका चौहान,रमाई बचत गट अध्यक्ष मिना प्रमोद बागडे,सचिव सिमा अनिल बागडे,

ग्राम पंचायत नायाकुंड सरपंच सुधीर अवस्थी, उपसरंचप अल्केश वाघाडे,सदस्य दिनेश उके, सोनु शेरकी, अनिता ठाकुर, कांचन कुंभरे, होमकला चव्हान, राधिका कुथे, आनंद बुद्ध विहार अध्यक्ष प्रियंका वासनिक, सचिव मनीषा शेंडे, ग्राम पंचायत परसोडी सरपंच सचिन आमले, उपसरंचप गौतम गजभिये, क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले वाचनालय अध्यक्ष सुरज शेंडे, उपाध्यक्ष विजय गणवीर,सचिव राहुल चिमणकर,सदस्य शुभम शास्त्री, रंजना सोमकुवर, सुमित गजभिये, सुषमा गणविर, अपेक्षा खोब्रागडे,गीता लांजेवार,

ग्राम पंचायत पारडी सरपंच स्वाती घारड, उपसरपंच पुष्पा कोल्हे, श्रावस्ती बौद्धविहार समिती निखिल शेंडे, ग्राम पंचायत दहेगाव जोशी सरपंच पवन बोंदरे,उपसरपंच भूपेंद्र तांदुळकर, त्रेलोक्य बौद्धविहार समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव, सदस्य यांच्यासह गावकरी यावेळी उपस्थित होते. त्यांनी बौद्धविहार/वाचनालय बांधकामकरिता निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आमदार ॲड आशिष जयस्वाल यांचे आभार मानले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: