Saturday, December 21, 2024
Homeराज्यआमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते बौद्धविहाराचे भूमिपूजन संपन्न...

आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते बौद्धविहाराचे भूमिपूजन संपन्न…

रामटेक – राजु कापसे

रामटेक – भारतरत्न डॉ. आंबेडकर सामजिक विकास योजना सन २०२२-२ ३अंतर्गत धम्मकेंद्र/वाचनालय, बौद्धविहार बांधकाम १ कोटी १५ लक्ष रुपयांचे भूमिपूजन रामटेकचे आमदार ॲड आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सभापती चंद्रकांत कोडवते, जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हर्षवर्धन निकोसे, शिवसेना रामटेक तालुका प्रमुख विवेक तुरक, हरिदास सांगोडे, राजकुमार खोब्रागडे उपस्थित होते. रामटेक तालुक्यांतील मानापुर येथे बौद्धविहार बांधकाम रु.३० लक्ष, शितलवाडी येथे बौद्धविहार/वाचनालय बांधकाम रु २५ लक्ष, ग्रा. पं. पटगोवारी अंतर्गत हेटीटोला येथे बौद्धविहार बांधकाम रु.२५ लक्ष, तसेच ग्रा. पं. कांद्री अंतर्गत हिवराबेंडे येथे बौद्धविहार बांधकाम रु.३५ लक्ष असे एकूण १ कोटी १५ लक्ष रुपयांचे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन प्रसंगी ग्रा. पं. मानापुर सरपंच संदिप सावरकर, उपसरपंच भरत अडकने, ग्रा. पं. सदस्य राहुल बोंदरे, आकाश चांदेकर, पुजा वाहणे, हंसा मानवटकर, रोशनी नगरे, भारती आस्टणकर, सपना हटवार, पंचशिल बुद्ध विहार अध्यक्ष,सचिव, सदस्य, उपस्थित होते.

ग्रा. पं.शितलवाडी सरपंच जयश्री मडावी,उपसरपंच प्रज्वल गेचुडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव विक्रांत नंदेश्वर, मनसर- शितलवाडी जिल्हा परिषद शिवसेना सर्कल प्रमुख धर्मराज रहाटे, ग्रा.पं.सदस्य संजय येनुरकर,अतुल यादव, अभिषेक सरोते, किशोर सहारे, कुंदा चौधरी, राजश्री जावळकर, स्वाती लोणारे, प्रभा देवढकले, नलिनी पराते, वैशाली सावरकर, दिशा बालपांडे, वनिता कोडवते उपस्थित होते. ग्रा. पं. पटगोवारी सरपंच सुखदास मडावी, उपसरपंच रोशन सुर्यवांशी, समाजसेवक अनुप कंभाले, ग्रा.पं.सदस्य पुसाराम भोयर,

अंजीरा भिमटे, भुमिता भोंडे,अजय मडावी, प्रतिभा वाहणे,संदीप सुर्यवंशी, समता बौद्धविहार अध्यक्ष रत्नपाल भैसारे, सचिव भोजराज घरडे,राजकुमार मेलवांशी, सरीता जुवार, हिना बागडे, योगिणी शेवाळे, तृप्ती बागडे, पौर्णिमा ठवरे,ममता सोमकुवर, ग्रा. पं. कांद्री सरपंच ममता बनसोड, उपसरपंच राजा कठोते, रणजीत डोंगरे, अमरदिप घरडे, धूर्वपाल लांजेवार, नवनीत बुद्ध विहार सचिव दिगांबर बागडे, विकास मेश्राम, सेवकराम बागडे,मनोज घरडे, संदीप लेंडेकर, कमला घरडे, निमा लांजेवार, हिना डोंगरे, कुसुम बागडे यांच्यासह गावकरी यावेळी उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: