रामटेक – राजु कापसे
दिनांक २४ जुन २०२४ रोजी भारतरत्न डॉ. आंबेडकर सामजिक विकास योजना सन २०२२-२ ३अंतर्गत धम्मकेंद्र/वाचनालय, बौद्धविहार बांधकाम १ कोटी ८६ लक्ष रुपयांचे भूमिपूजन रामटेकचे आमदार ॲड आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भदंत नाग दिपंकर, भदंत डॉ.सिल्वासा थेरो, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हर्षवर्धन निकोसे, माजी जि.प.सदस्य नंदा लोहबरे, शिवसेना मौदा तालुका प्रमुख नितेश वांगे, विवेक तुरक, हरिदास सांगोडे,विकास झाडे,राजकुमार खोब्रागडे,भुमेश्र्वर चाफले,
योगराज घरपडे, ज्ञानेश्वर चौरे, प्रमोद काकडे, संकेत झाडे उपस्थित होते. मौदा तालुक्यांतील नेरला येथे बौद्धविहार बांधकाम रु.२५ लक्ष,चाचेर येथे बौद्धविहार बांधकाम रु .५० लक्ष, खंडाळा गांगनेर बौद्धविहार बांधकाम रु.२५ लक्ष, बारसी येथे बौद्धविहार बांधकाम रु.३० लक्ष,निमखेडा येथे बौद्धविहार/ वाचनालय बांधकाम रु.३० लक्ष, पारडीकला येथे बौद्धविहार बांधकाम रु.२५ लक्ष असे एकूण १ कोटी ८५ लक्ष रुपयांचे भूमिपूजन करण्यात आले.
भूमिपूजन प्रसंगी नेरला ग्रा. पं.सरपंच ना कडू,उपसरपंच रोशन मेश्राम, .ग्रा. पं.पारडीकला सरपंच दुर्गेश पटिये,ग्रा.पं.निमखेडा उपसरपंच चंद्रशेखर गभने, खंडाळा (गां.) माजी सरपंच प्रदिप राऊत,समीर गजभिये, सिद्धार्थ शिंगाडे, नंदकिशोर राऊत, पंढरी कडु, जयदेव मस्के, धर्मराज झलके,निखिल कडु, शुभम गिरडकर,जय लोहबरे, राधेश्याम सोनसरे,अरुण घरजाळे, संजु कडबे, विनोद तिवाडे, अभिषेक चोपकर, माधुरी कडू, सीमा चांदेकर, निकिता काटे, अनिता भोंडे, संतोष देशकर सह गावकरी यावेळी उपस्थित होते.