Sunday, December 22, 2024
Homeराज्यथोडक्यात बचावले आमदार अमोल मिटकरी?… मिटकरी यांच्या गाडीचे मनसे पदाधिकाऱ्याकडून तोडफोड…८ पदाधिकाऱ्यांसह...

थोडक्यात बचावले आमदार अमोल मिटकरी?… मिटकरी यांच्या गाडीचे मनसे पदाधिकाऱ्याकडून तोडफोड…८ पदाधिकाऱ्यांसह इतर जणांवर गुन्हे दाखल..

राष्ट्रवादीचे आमदार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार अमोल मिटकरी यांच्यावर आज अकोल्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केलाय. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडलीय. यामध्ये आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलीये.

काल पुण्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली होतीय. त्या टिकेला उत्तर देताना आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हटले होतेय. यावरूनच संतप्त कार्यकर्त्यांनी आज अमोल मिटकरी यांच्यावर आणि गाडीवर हल्ला केलाय.

आमदार अमोल मिटकरी दुपारी लोकांना भेटण्यासाठी अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर आले होतेय. याचवेळी मनसेची एक आढावा बैठक विश्रामगृहात सुरू होतीय. मिटकरी विश्रामगृहावर असल्याचा समजतात मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेत त्यांच्याविरोधात प्रचंड नारेबाजी केलीय.

यावेळी मिटकरींनी आपल्या खोलीतील अँटीचेंबरचा दरवाजा लावल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय यासंदर्भात अकोल्यातील सिविल लाईन पोलिसात हल्लेखोर मनसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहेय. हल्ला करणारे सर्व मनसैनिक सध्या फरार आहेत. हल्ल्यानंतर आपल्याला जीवे मारण्याचा मनसे कार्यकर्त्याला प्रयत्न असल्याचा आरोप आमदार म्हणून मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना केलाय.

या तोडफोड प्रकरणी 8 आणि इतर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिसांनी दाखल केले आहेत. आरोपींमध्ये मनसे सरचिटणीस करर्णबाळा दुनबळे, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, सौरभ भगत, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर करण्यात आला मिटकरींवर हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीची तोडफोड. राज ठाकरेंच्या अजित पवारांवरील टिकेला उत्तर देतांना मिटकरींनी राज ठाकरेंना म्हटलं होतं सुपारीबहाद्दर. याच रागातून मनसे कार्यकर्त्यांनी केला राडा. सर्व मनसे कार्यकर्ते फरार.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: