Sunday, December 22, 2024
Homeराज्यआमदार आकाश दादा फुंडकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा...

आमदार आकाश दादा फुंडकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा…

आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा मोर्चा तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन…

खामगाव (का.प्र.)- हेमंत जाधव

दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकप्रिय आमदार आकाश फुंडकर यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्याअनुषंगाने खामगाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अ‍ॅड.आकाश फुंडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन युवा मोर्चा खामगाव तालुकाच्या वतीने 5 फेब्रुवारी 2023 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये श्रीक्षेत्र अटाळी व आंबेटाकळी येथे दुग्धाअभिषेक, वृक्षारोपण, अटाळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रूग्णांना फळवाटप तसेच लाखनवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, बोथाकाजी प्राथमिक आरोग्य केंद्र, रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्र, पि.राजा प्राथमिक आरोग्य केेंद्र येथे रूग्णांना फळवाटप तसेच वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला युवा मोचार्र् पदाधिकारी व युवा मोर्चाचे कायकर्ते व जेष्ठ मंडळी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रूपेश खेकडे यांच्यासह युवा मोर्चा पदाधिकार्‍यांंनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: