Mizoram Assembly Result : मिझोरामच्या 40 विधानसभा जागांवर 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाचे निकाल आज जाहीर होणार आहेत, ज्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. राज्यांमध्ये मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यावेळी मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट (MNF), झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र आतापर्यंत कॉंग्रेसला 1 ठिकाणी पुढे असल्याने झोरम पीपल्स मूव्हमेंट आघाडीकडे वाटचाल करीत आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत एकूण 174 उमेदवार रिंगणात आहेत, त्यात 18 महिला उमेदवारांचा समावेश आहे. 7 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात राज्यातील 8.57 लाख मतदारांपैकी 80 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) सध्या 28 जागांवर आघाडीवर असून एक जागा जिंकली आहे. मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) सात जागांवर आघाडीवर आहे, तर भारतीय जनता पक्ष (भाजप) तीन जागांवर आघाडीवर आहे. तर कॉंग्रेस 1 जागेवर सध्या 39 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.
13 मतमोजणी केंद्रांवर प्रत्येक 40 विधानसभा जागांसाठी एक मतमोजणी हॉल बांधण्यात आला आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. सर्व प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे आणि त्यानंतर ईव्हीएममध्ये टाकलेल्या मतांची मोजणी सुरू झाली. यावेळी मिझोराममध्ये तिरंगी लढतीचा दावा केला जात आहे. मात्र बहुमत झोरम पीपल्स मूव्हमेंट कडे जाताना