Monday, December 23, 2024
Homeराज्यपुरोगामी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सांगली बंदला संमिश्र प्रतिसाद...

पुरोगामी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सांगली बंदला संमिश्र प्रतिसाद…

सांगली प्रतिनिधी — ज्योती मोरे
भाजपातील अनेक नेत्यांचं राज्यपालांनी महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सांगलीतील सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने आज सांगली बंदचा इशारा देण्यात आला होता. सदर बंदला सांगली शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

यावेळी सर्व पुरोगामी संघटना एकत्र येऊन, स्टेशन चौकातून रॅली काढून शिवतीर्थावर मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, प्रसाद लाड यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

सदर मोर्चा मध्ये सांगली मधील अनेक पुरोगामी विचारांचे नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: