सांगली – ज्योती मोरे
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधु ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरजेतील दुकाने आणि हॉटेल पाडल्याच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मिरज बंदची हाक देण्यात आली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट एमआयएम, पी आर पी, आर पी आय पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उत्स्फूर्तपणे बंद पाळण्याबाबतचा आवाहन करण्यात आले होते.