Monday, December 23, 2024
HomeTechnologyMission Gaganyaan | आता प्रवाशांना अवकाशात पाठविण्यासाठी मोहीम...पहिली मानवरहित उड्डाण चाचणी लवकरच...ISRO

Mission Gaganyaan | आता प्रवाशांना अवकाशात पाठविण्यासाठी मोहीम…पहिली मानवरहित उड्डाण चाचणी लवकरच…ISRO

Mission Gaganyaan – भारताचे चंद्रावर Chandrayan 3 यशस्वी लँडिंग झाल्यानंतर आता प्रवाशांना अवकाशात पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सांगितले की, गगनयान मोहिमेसाठी मानवरहित उड्डाण चाचणी लवकरच सुरू होणार आहे.

पुढील वर्षी लॉन्च होईल

सुमारे 900 कोटी रुपये खर्चाची ही मोहीम पुढील वर्षी सुरू होणार आहे. याआधी यासाठी तीन वाहनांच्या चाचण्या कराव्या लागतील. यापैकी पहिले वाहन चाचणी मिशन TV-D1 असेल, दुसरे TV-D2 मिशन असेल आणि तिसरी चाचणी LVM3-G1 असेल. हे एक मानवरहित मिशन असेल.

क्रू सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न

इस्रोने सांगितले की, गगनयानचे चाचणी वाहन लवकरच लॉन्च केले जाईल. जेणेकरून क्रू एस्केप सिस्टमची चाचणी घेता येईल. त्यासाठी फ्लाइट टेस्ट व्हेईकल एबॉर्ट मिशन-१ (टीव्ही-डी१) ची तयारी सुरू आहे.रोबोट आणि ह्युमनॉइड्स (मानवासारखे रोबोट) अवकाशात पाठवून क्रूच्या सुरक्षेची खात्री केली जाणार आहे. गगनयानच्या तिसर्‍या वाहन चाचणी, LVM3-G1 अंतर्गत पाठवल्या जाणार्‍या ह्युमनॉइडद्वारे क्रूसमोरील सर्व आव्हानांची माहिती गोळा केली जाईल.

सप्टेंबरमध्ये प्रकल्प संचालक आर हटन म्हणाले होते की, इस्रो या मोहिमेसाठी चार अंतराळवीरांना प्रशिक्षण देत आहे. ही भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असेल. या मोहिमेअंतर्गत तीन अंतराळवीरांना 400 किमीच्या कक्षेत पाठवून त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणले जाईल. हटन म्हणाले होते की गगनयानचे चाचणी वाहन पुढील महिन्यात लाँच केले जाईल जेणेकरून क्रू एस्केप सिस्टमची चाचणी घेता येईल.

प्रणाली कधी वापरली जाते?

आपत्कालीन स्थितीत अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जाऊ शकतो. हटन यांनी सांगितले होते की, गगनयानच्या सध्या अंतिम टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. हटन म्हणाले होते की अंतराळवीरांच्या सुरक्षिततेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे, चाचण्यांद्वारे आम्ही हे सुनिश्चित करू इच्छितो की क्रूला कोणतीही हानी होणार नाही.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: