न्यूज डेस्क : अल्पावधीत संपूर्ण भारतात प्रसिद्ध झालेले बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारातील एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामुळे अनेक लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सध्या दिल्लीला लागून असलेल्या यूपीच्या ग्रेटर नोएडा येथील दरबारात स्टेजकडे जात असलेल्या मुलीला बॅरिकेडवरून फेल्याचा हा व्हिडिओ आहे.
यूपीच्या ग्रेटर नोएडाच्या दरबारात कथेला मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, नोएडामध्ये आयोजित केलेल्या या कथेशी संबंधित वादही आता समोर येत आहेत. धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका मुलीला उचलून बॅरिकेडच्या पलीकडे फेकले जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की धीरेंद्र शास्त्री स्टेजवर बसले आहेत आणि यादरम्यान एका मुलीने बॅरिकेड ओलांडले. हे पाहून तेथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मुलीला उचलून बॅरिकेडच्या पलीकडे फेकले. यावेळी पोलीस कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली जात असल्याचे सांगितले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.