सांगली – ज्योती मोरे.
मिरजेत गेली दहा वर्ष क्रांतीज्योत रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे या क्रांतीज्योत मिरवणुकीचे आयोजन हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख यांच्या नेतृत्वाखाली निघाली क्रांतीज्योतचे प्रज्वलन पलूस पंचायत समितीचे माजी सभापती विजय कांबळे,टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष जैलाब शेख,सामाजिक कार्यकर्ते नारायण बेळगावकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाप्रमुख प्रमोद इनामदार व शिवसेनेचे कार्यकर्ते सागर मेटकरी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
तसेच शिवराज्य कामगार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष प्रशांत ढंग व शिवसेना गुंठेवारी समितीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष विजय बल्लारी सामाजिक कार्यकर्त्या पूजा पाटील,जीवन वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले टिपू सुलतान क्रांतीज्योत रॅलीची सुरुवात मिरज किसान चौक पासून सुरवात करण्यात आली.
भंडारी बाबा चौक हजरत ख्वाजा शमनामीरा दर्गा मार्गे स्टेशन पोलीस चौकी होत स्वर्गीय अहमदबाशा चौक येथे मिरवणुकीची सांगता झाली यावेळी प्रमुख वक्त्यांनी स्वातंत्र सेनानी हजरत टिपू सुलतान यांच्या बद्दल आपले विचार मांडले यानंतर या ठिकाणी स्वातंत्र सेनानी टिपू सुलतान यांच्या फोटोला विजय कांबळे,जैलाब शेख,नारायण बेळगावकर,नगरसेवक स्वाती पारधी यांनी पुष्पहार अर्पण केले.
मिरजेत मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी व जनतेने सहभाग घेतला यावेळी पोलिसांनी देखील मिरवणूक मार्गावर चोक बंदोबस्त ठेवला होता.वेळी नासिर शेख,मुन्ना गाडत,जमीर शेख,जुबेर येरगट्टी, शकील पटेल,मेहबूबअली मनेर, अर्कान बेग,झेन सय्यद,आदिल मकानदार,साद गवंडी,हसन पटेल,मुस्तफा बुजरूक, अरबाज ईमदार आदी कार्यकर्त्यते उपस्थित होते.