सांगली – ज्योती मोरे.
आपण नेहमीच्या घडामोडी पाहता असतो की पुरुष मंडळी महिलांना मारतात असं चित्र दिसते. पण मिरजमध्ये गोसावी समाजामध्ये स्त्रिया होळीच्या सणावेळी पुरुषांना काठीने अक्षरशः बदडून काढतात. होळीच्या निमिताने गोसावी समाजात अनेक वर्षांपासून झेंड्याचा खेळ खेळला जातो.
या खेळा दरम्यान महिला पुरुषांना काठीने मारतात. अनेक वर्षांपासून म्हणजे सरासरी 100 वर्षांपासूनची ही अनोखी परंपरा गोसावी समाजात चालू आहे. गोसावी समाजात होळीनंतर तिसऱ्या दिवशी झेंड्याचा खेळ-खेळला जातो. ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्याच ठिकाणी गल्लीच्या मध्यभागी झेंडा बांधला जातो आणि तो झेंडा पकडून सर्व महिला उभ्या असतात.
तर पुरुषांकडून तो झेंडा पळवण्याचा प्रयत्न केला जातो. तर महिला, पुरूषांना झेंडा पळवून नेण्यापासून रोखत असतात.यावेळी पुरुष मंडळीना पिटाळून लावण्यासाठी महिला पुरुषांना काठीने बदडून काढत असतात.पश्चिम महाराष्ट्रातील गोसावी समाज मोलमजुरी करुन आपले जीवन चालवत असतो. होळीच्या दिवशी पुरुष मंडळीना काठीने मारण्याची परंपरा मिरजेतील गोसावी समाजात वर्षानुवर्षे चालत आली आहे.