सांगली – ज्योती मोरे.
मिरजेत इदगाह मैदानावर असंख्य मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केली यावेळी बयान हाफिज मुफ्ती मोहम्मद सुफियान यांनी केले तर नमाज पठण हाफिज मुफ्ती निजाम संदीने आदा केले व खुदबा पठण बृहानुदिन खतीब यनी केली.महेबूबआली मनेर यांच्या देखरेखित चांगल्या पद्धतीचे ईदग्यावर स्वच्छता व नेटके नियोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रार्थना करताना सर्व मुस्लिम बांधवांनी देशात सुख, समृद्धी शांतता लाभो व हिंदू मुस्लिम ऐक्य कायम व सलोख्याचे राहो,याकरिता मुस्लिम बांधवांनी सर्व भारतीय साठी प्रार्थना केली. यावेळी पोलीस प्रशासनाकडून चांगल्या पद्धतीचा बंदोबस्त करून मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा कक्ष उभारून शुभेच्छा दिल्या.
अनेक हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना एकमेकांना गळाभेट करून शुभेच्छा देण्याकरिता खास उपस्थित होते.या सर्वांचे देखील मुस्लिम बांधवांनी आभार मानले. सांगली जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी पिंगळे साहेब,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टेके साहेब,मिरज गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव साहेब,काँग्रेस पक्षाचे नेते विशाल पाटील तसेच जनसुराज्य पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुमित कदम,
एम आय एमचे डॉ. महेश कांबळे,हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख, उत्तम आबा कांबळे,राष्ट्रवादीचे बाळासाहेब व्हनमोरे, सामाजिक कार्यकर्ते आयुब इनामदार सह अनेक हिंदू मुस्लिम बांधव मैदानावर उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संयोजकांनी पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासनाचे आभार मानले.खास करून नमाज साठी येणाऱ्या व बंदोबस्तात असलेल्या पोलीस कर्मचारी व इतर सेवा प्रदान करणाऱ्या सर्वांना मुस्लिम समाजाच्या वतीने सरबतीचे आयोजन केले होते. इदगाह मैदानावर आनंदमय व उत्साहमय वातावरणात नमाज अदा केली.