सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे.
मिरज शहरातील प्रमुख चौकात विनापरवाना हातगाड्यांचा सुळसुळाट,विनापरवाना डिजिटल फलक,यामध्ये गायब झालेले फुटपाथ, बेकायदेशीर लोणी बाजार ही अतिक्रमने हटवण्यासाठी मिरज मध्ये महानगरपालिकेने सक्षम अतिक्रमण हटाव पथक अधिकारी नेमावा.
अशी मागणी आज मिरज सुधार समितीच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संजीव ओहोळ आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा 31 मे पासून मिरजेतील महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशाराही मिरज सुधार समितीने दिला आहे.
यावेळी एडवोकेट ए.ए.काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, शंकर परदेशी, जाहीर मुजावर, गीतांजली पाटील, सुभान सौदागर, राजेंद्र झेंडे, श्रीकांत महाजन, वसीम सय्यद ,आदी मान्यवर उपस्थित होते.