Thursday, December 26, 2024
Homeराज्यकामगार राज्यमंत्र्यांची सुर्यलक्ष्मी कॉटन मिलवर धडक, कामगार राज्यमंत्री ॲक्शन मोडवर...

कामगार राज्यमंत्र्यांची सुर्यलक्ष्मी कॉटन मिलवर धडक, कामगार राज्यमंत्री ॲक्शन मोडवर…

कामगारांचे शोषण उघडकीस, अधिकाऱ्यांना दिले कडक कारवाईचे आदेश

रामटेक – राजू कापसे

आज दि. 26/12/2024 रोजी कामगार विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुर्यलक्ष्मी कॉटन मिल येथे पाठवून कामगार कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. कंपनीत अनेक कंत्राटी कामगारांमार्फत शोषण उघडकीस आले.

कामगारांना नियमानुसार पगार, सुटी, पीएफ व विमा योजनेचा लाभ मिळत नसल्याचे उघडकीस आले. त्यावर सखोल चौकशी करून सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्याचे व कंपनी प्रशासनावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले.

कामगारांचे प्रलंबित ॲग्रीमेंटदेखील तात्काळ पुर्ण करण्याबाबत त्यांनी कंपनी प्रशासनाला ताकीद दिली व यापुढे अश्या पध्दतीची वागणुक व वर्तणुक सहन केली जाणार नाही व यात कसुर केल्यास सरकारला आपली ताकद दाखवावी लागेल व कंपनीला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असेदेखील त्यांनी ठणकावून सांगितले.

अधिकाऱ्यांचीही या प्रकरणात ताराबंळ उडाली व त्यांनी एका आठवड्यात कारवाई करण्याचे सांगितले. यावेळी अप्पर कामगार आयुक्त किशोर दहिफळकर, सहाय्यक कामगार आयुक्त उज्वल लोया, राजदीप धुर्वे, कंपनी सीईओ सिध्दांत शर्मा, वाईस प्रेसिडेंट बी. ए. थोरात, कामगार प्रतिनिधी योगेश गडे, प्रदीप बावणे, जगदीश पटले, रेवनाथ मदनकर, संजय अजबैले, मुकेश बिरनवार, कैलास सुवासार व मोठ्या प्रमाणात कामगार उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: