Sunday, December 22, 2024
Homeराज्यउच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील...

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा अमरावती दौरा…

अमरावती – दुर्वास रोकडे

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा दि. 14, 15 व 16 ऑगस्ट 2024 रोजीचा अमरावती दौरा पुढीलप्रमाणे: बुधवार, दि. 14 ऑगस्ट रोजी नागपूर येथून रात्री 9 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन व मुक्काम.

गुरूवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.55 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथून वाहनाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 9.05 वाजता विभागीय कार्यालय येथे आगमन व भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास उपस्थिती. सकाळी 11 वाजता प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट, वलगाव येथे आगमन व सन 2024-25 राजभाजी महोत्सव समारंभास उपस्थिती.

दुपारी 12.10 वाजता वलगाव येथून वाहनाने कुरलपुर्णा, ता. चांदूरबाजारकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता सत्यशोधक बहुउद्येशिय शिक्षण संस्था, निवासी मूकबधीर विद्यालय टोंगलापूर फाटा मासोद, पो. कुरलपूर्णा, ता. चांदुरबाजार येथे आगमन व आमदार बच्चू कडू यांची सदिच्छा भेट. दुपारी 4.30 वाजता आमझरी पर्यटन संकुल, आमझरी ता. चिखलदरा येथे भेट व साहसी खेळ चालविणाऱ्या युवक-युवतींशी चर्चा. सायंकाळी 5.30 वाजता प्रकाश होम स्टे, खटकाली, ता. चिखलदरा येथे आगमन व सदिच्छा भेट. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, चिखलदरा येथे आगमन, राखीव व मुक्काम.

शुक्रवार दि. 16 ऑगस्ट रोजी सकाळी 8.50 वाजता शासकीय विश्रामगृह, चिखलदरा येथून वाहनाने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता चिखलदरा, कुंभी बल्ला, भिमकुंड येथे आगमन व गावीलगड वन्यजीव परिक्षेत्रातील निसर्गानुभव मचाणीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सकाळी 10 वाजता भिमकुंड येथील साहसी खेळ प्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती.

सोयीनुसार चिखलदरा येथून वाहनाने अमरावतीकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह अमरावती येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, अमरावती येथे जिल्हा क्रीडा संकुल लोकार्पण व विविध क्रीडा सुविधा भुमिपूजन समारंभास उपस्थिती. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह अमरावती येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथून वाहनाने नागपूरकडे प्रयाण.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: