अमरावती – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा उद्या, रविवार, दि. 4 ऑगस्ट 2024 रोजीचा अमरावती दौरा पुढीलप्रमाणे: रविवार, दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 8.55 वाजता नागपूर विमानतळ येथून वाहनाने अमरावतीकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन व राखीव.
दुपारी 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने नियोजन भवनाकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता नियोजन भवन सभागृह पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 3 वाजता नियोजन भवन सभागृह येथे ग्राम रिध्दपूर येथील पोलीस चौकीच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता महसूल भवन जिल्हाधिकारी कार्यालय,
अमरावती येथे आगमन व शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात विविध प्रशासकीय प्रमुख्यांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन व राखीव. संध्याकाळी 6.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने अमरावती रेल्वेस्थानकाकडे प्रयाण. संध्याकाळी 6.45 वाजता अमरावती रेल्वेस्थानक येथे आगमन व राखीव. संध्याकाळी 7.10 वाजता अमरावती रेल्वेस्थानक येथून अमरावती एक्सप्रेसने जळगावकडे प्रयाण.