विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न…
रामटेक – राजु कापसे
विकास कामांमध्ये आघाडीवर असलेले रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्या कार्याची दखल घेत शिवसेने राज्यमंत्री पदी नियुक्ती केली. त्यांच्याकडे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार, या खात्याचा पदभार देण्यांत आला आहे.
हा पदभार स्वीकारताच आमदार जयस्वाल यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघातील आदिवासी बहुल भागातील उमरी-बोथिया पालोरा व वडंबा-पथरई जिल्हा परिषद सर्कलमध्ये भुमिपुजन, विकास कामाची पाहणी व दौरा आयोजीत केला. आज दिनांक (१० जानेवारी) रोजी हा दौरा संपन्न झाला.
यात देवलापार, मौदी,पवनी, चारगाव, हिवरा, पथरई, शहापूर, जमुनिया, मोहगाव, घोटी, पिपरिया, खापा, झिंझेरिया, डोंगरताल, वडांबा, कामठी, कडबीखेडा, उसरीपार, सावरा, बांद्रा, करवाही,लोधा, सितापार,पिंडकापार, बेलदा, खनोरा, टुयापार, अकोला, तुमडीटोला, हिवराबाजार गावांना मंत्री जयस्वाल यांनी भेट दिली.
या दौऱ्या दरम्यान देवलापार दुर्गा मंदिर येथे पुजा करून या दौऱ्याची सुरूवात झाली. तर मौदी चारगाव पुलासह पोच रस्ता भुमिपुजन, हिवरा वथरई पोच रस्त्यावरील पुलाचे भुमिपुजन,पथरई बंजार रस्त्याचे भुमिपुजन,पथरई गावाला पुलासह बांधकाम भुमिपुजन,शहापूर पोच मार्ग रस्त्याचे भुमिपुजन,जमुनिया मोहगाव रीठी रोड बांधकामाचे भूमिपुजन,
घोटी जि.प. शाळेजवळ भेट,पिपरीया येथे भेट,वनविभाग अमलतास सिल्लारी येथे मिटींग, खापा टी-पॉईंट जवळ, खापा झिंझेरीया रस्त्याचे भूमिपुजन,झिंझेरीया येथे भेट,डॉगरताल कट्टा रस्ता पाहणे,वडंबा येथे भेट,कामठी मार्गे कडबोखेडा येथे कडबी खेडा डोंगरताल रस्त्याचे पाहनी करणे, उसरीपार उसरीपार टोला फॉरेस्ट गेट पर्यंत रस्त्याचे भुमिपुजन,
उसरीपार सावरा रोडवरील पुलाचे पाहनी करणे, भुमिपुजन, सावरा ते कामठी रस्त्याचे पाहणी करणे, बांद्रा येथे भेट, करवाही मरार टोला रोड व खंडासा रोड पाहणी करणे,लोधा पांदन रस्ता पाहणी करणे,सितापार येथे भेट, पिंडकापार येथे भेट, बेलदा पुलाचे बांधकाम पाहने,खनोरा, खनोरा टुयापार रोड पाहणी करणे, अकोला येथे रस्त्याची पाहणी करणे, हिवरा बाजार येथे भेट, तुमडीटोला येथे पुलाची पाहणी करण्यात आली.
चालू असलेल्या सर्व कामांची पाणी करून सर्व काम दर्जेदार व लवकरात लवकर करण्यात यावें अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यांत आल्या. यावेळी ग्रामस्थांनी मंत्री जयस्वाल यांचे जागोजागी भव्य दिव्य स्वागत केले. तर या स्वागता प्रती मंत्री जयस्वाल यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी रामटेक शिवसेना तालुका प्रमुख विवेक तुरक,उप तालुका प्रमुख देवानंद वंजारी, युवासेना उपजिल्हा प्रमुख कमलेश शरणांगात, पंचायत समिती सभापती चंद्रकांत कोडवते, माजी सभापती संजय नेवारे, शिवा कोकोडे,रोमित गुप्ता, प्रितम गुप्ता,शेखर खंडाते,आकाश पंधरे, सिमी गुप्ता, रिजवान शेख,आकाश जयस्वाल , एकनाथ गोडबोले,
अशोक जयस्वाल,ग्राम पंचायत वडांबा सरपंच मुकेश दुबे, ग्रा.पं.सालई सरपंच उत्तम धराडे, ग्रा.पं.वराघाट सरपंच देवराज इनवाते, ग्रा. पं. दाहोदा सरपंच वासनिक, ग्रा. पं. पिंडकापार लोधा सरपंच विलास उईके, ग्रा. पं. बांद्रा सरपंच कल्पना भलावी, कुंदन वैद्य, काशिनाथ मरसकोल्हे, चमन जयस्वाल, बंटी गुप्ता यांच्यासह वनविभाग, महसुल विभाग, सार्वजानिक बांधकाम विभाग,पोलिस प्रशासन विभाग, पंचायत समिती चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.