Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यमिलिंद इंगळे यांना मिळाला महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार...

मिलिंद इंगळे यांना मिळाला महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार…

मराठी साहित्य वार्ता औरंगाबाद आयोजित दुसऱ्या मराठी साहित्य संमेलन बीड येथे झालेल्या, महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने गीतकार,गझलकार मिलिंद इंगळे यांच्या “तिच्या उदरी तिच्या पदरी” या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य भुषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या आधी पण मिलिंद इंगळे यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. मिलिंद इंगळे कलाविष्कार साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्या नावाने दरवर्षी राज्यस्तरीय कला व साहित्य संमेलन ते घेत असतात. मराठी साहित्याचा प्रचार व प्रसार साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ते करत असतात.

याच अनुषंगाने मराठी साहित्य वार्ताचे संचालक अमरदीप वानखडे यांनी कार्याची दखल घेऊन मिलिंद इंगळे यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्यानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कलाविष्कार परिवार, गझलदीप प्रतिष्ठान,सृजन साहित्य संघ,अंकूर साहित्य संघ,तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी अकोला,अशा विविध संस्थेकडून शुभेच्छा देण्यात येत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: