Mia Khalifa : सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी सकाळी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केला. दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 1600 लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या या रानटी हल्ल्यावर अनेक जण टीका करत आहेत, पण काही लोक पॅलेस्टाईनच्या बाजूनेही उभे आहेत. त्यापैकी एक म्हणजे मिया खलिफा, जिने पॅलेस्टाईनशी एकजुटीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. तर आता तिने त्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
एडल्ट स्टार मिया खलिफाने पॅलेस्टाईनसोबत एकजुटीचे वक्तव्य केले आहे. मियाने ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘तुम्ही पॅलेस्टाईनमधील परिस्थिती पाहता आणि पॅलेस्टिनींच्या बाजूने नसाल तर तुम्ही भेदभाव करत आहात, आणि इतिहास हे काळानुसार दाखवेल.’ मग काय, हे म्हटल्यावर जणू काही जण मिया खलिफावर वाईट टीका सुरु झाल्यात. एका यूजरने लिहिले की, हे ट्विट करण्यापूर्वी तुम्हाला हमासने केलेला बर्बरपणा दिसली नसेल. तुम्ही कदाचित चुकीच्या बाजूला उभे आहात आणि इतिहास तुम्हाला आरसा दाखवेल. काही यूजर्सने लिहिले की मियाला या ट्विटसाठी पैसे मिळाले आहेत.
तिने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘बनावट गुच्ची शर्टमागे झिओनिस्ट भेदभाव लपविला जात आहे यावर माझा विश्वास बसत नाही. या क्षणांचे बायोपिक हे अधिक चांगले दाखवतात. त्यांच्या या ट्विटने रेड लाइट हॉलंडचे सीईओ टॉड शापिरो यांचे लक्ष वेधून घेतले आहे. टॉड शापिरोची कंपनी अमेरिका आणि युरोपमध्ये मशरूम होम ग्रोथ किटचे उत्पादन आणि विक्री करते. या वर्षाच्या सुरुवातीला, त्याने मिया खलिफाला कंपनीत आणले, जिथे ती कंपनीचा ऑनलाइन व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करणार होती.
रेड लाइट हॉलंडचे सीईओ टॉड शापिरो यांना इस्रायल विरुद्ध हमासवरील पोस्टमुळे धमकी दिली आहे. यानंतर त्याने सोशल मीडियावरच मिया खलिफाला नोकरीतून काढून टाकल्याची घोषणा केली. दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली पण मियाने आता तिची नोकरी गमावली आहे. आता यावर मिया खलीफाने स्पष्टीकरण दिले आहे. “मी फक्त हे स्पष्ट करू इच्छितो की हे विधान कोणत्याही प्रकारे हिंसाचार पसरवणारे किंवा आकार देत नाही, मी विशेषतः स्वातंत्र्य सैनिक म्हटले कारण पॅलेस्टिनी नागरिक हेच आहेत… दररोज स्वातंत्र्यासाठी लढत आहेत”
I just want to make it clear that this statement in no way shape or form is enticing spread of violence, I specifically said freedom fighters because that’s what the Palestinian citizens are… fighting for freedom every day https://t.co/U9mLwzqnnT
— Mia K. (@miakhalifa) October 9, 2023