Sunday, September 22, 2024
HomeIPL CricketMI vs SRH | वडील सचिन तेंडुलकर यांना शून्यावर बाद करणाऱ्या गोलंदाजाचा...

MI vs SRH | वडील सचिन तेंडुलकर यांना शून्यावर बाद करणाऱ्या गोलंदाजाचा अर्जुनने घेतला बदला…शेवटच्या षटकात अर्जूनने कमाल केली…

MI vs SRH : आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा त्यांच्या घरच्या मैदानावर 14 धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई संघाचे दोन गुण झाले. त्याचे आता पाच सामन्यांत सहा गुण झाले आहेत. रोहित शर्माचा संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी हैदराबादचा हा तिसरा पराभव असून गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर आहे.

सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत पाच गडी गमावून 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 19.5 षटकांत 178 धावांत सर्वबाद झाला.

मुंबईचा सलग तिसरा विजय
या पराभवासह सनरायझर्सची विजयी मालिका खंडित झाली आहे. तिला गेल्या दोन सामन्यांत यश मिळाले, पण विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही. त्याचबरोबर मुंबईचा हा सलग तिसरा विजय आहे.

अर्जुनने शेवटच्या षटकात 20 धावा वाचवल्या
सनरायझर्स हैदराबादला शेवटच्या षटकात 20 धावांची गरज होती. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने युवा अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजीसाठी बोलावले. अर्जुनने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत अवघ्या चार धावा दिल्या. त्याच्या षटकात दोन विकेटही पडल्या. अब्दुल समद दुसऱ्या चेंडूवर धावबाद झाला आणि पाचव्या चेंडूवर अर्जुन तेंडुलकरने भुवनेश्वर कुमारला रोहित शर्माकडे झेलबाद करून सनरायझर्सचा डाव गुंडाळला.

अर्जुन तेंडुलकरने शेवटच्या षटकात भुवनेश्वर कुमारला बाद करताना वडिलांचा वर्षानुवर्षे जुना बदलाही घेतला. 2008-09 च्या रणजी हंगामात सचिन तेंडुलकर मुंबईकडून खेळत होता. त्यावेळी भुवनेश्वर कुमार 19 वर्षांचा होता आणि तो उत्तर प्रदेशकडून खेळत होता. या दोघांमध्ये झालेल्या सामन्यात सचिनसमोर गोलंदाजी करायला आलेल्या भुवनेश्वर कुमारच्या इनस्विंगरवर सचिन तेंडुलकर शून्यावर बाद झाला.

या विकेटनंतर भुवनेश्वर कुमारच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या. रणजी ट्रॉफीमध्ये सचिन तेंडुलकरला शून्यावर बाद करणारा भुवनेश्वर हा पहिला गोलंदाज ठरला. आणि वर्षांनंतर जेव्हा सचिनचा मुलगा अर्जुनने भुवनेश्वरची विकेट घेतली तेव्हा सगळ्यांना हा प्रसंग आठवला. अशात सचिन तेंडुलकरला शून्यावर बाद करणाऱ्या खेळाडूकडून अर्जुनने बदला घेतला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: