आयकॉनिक ऑटोमोबाइल्स निर्माण करण्याच्या जवळपास शतकापूर्वीच्या वारसाला अधिक पुढे घेऊन जात एमजी मोटर इंडियाने आज त्यांच्या आगामी स्मार्ट ईव्हीचे नाव ‘कॉमेट’ असण्याची घोषणा केली; हे नाव इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मॅक रॉबर्टसन एअर रेसमध्ये सहभाग घेतलेल्या आयकॉनिक १९३४ ब्रिटीश विमानामधून प्रेरित आहे.
शहरांमधील वर्दळीमध्ये वाहन चालवणे तणावपूर्ण झालेल्या काळात ‘कॉमेट’ दाखल झाली आहे, तसेच गगनाला भिडलेले इंधन खर्च, पार्किंगच्या जागेची कमतरता व वाढत्या प्रदूषणामुळे चपळ व भावी सोल्यूशन्सची नितांत गरज आहे. ‘कॉमेट’ एकसंधी कनेक्टेड, ऑटोमॅटिक, इलेक्ट्रिक व शेअर्ड मोबिलिटी देत हे ध्येय साध्य करण्यामध्ये एक पाऊल पुढे आहे.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव छाबा म्हणाले, ‘‘शहरी गतीशीलता अशा टप्प्यावर आहे, जेथे सध्याच्या, तसेच भावी आव्हानांचे निराकरण करण्यासाठी आधुनिक सोल्यूशन्सची गरज आहे. आपण डिजिटल युगामध्ये अधिक वाटचाल करताना आपल्याला मोठ्या प्रमाणात नवोन्मेष्कारी बदल पाहायला मिळतील,
ज्यामध्ये भावी तंत्रज्ञान, अद्वितीय डिझाइन्स ते गतीशीलता अशा अनेक गोष्टींचा समावेश असेल. एमजीमध्ये आमचा ‘कॉमेट’च्या माध्यमातून आपल्यापैकी प्रत्येकासाठी चांगल्या भविष्यासाठी उपाय साध्य करण्याच्या दिशेने आवश्यक निर्णायक पावले उचलण्याचा आणि ‘विश्वासाची झेप’ घेण्याचा मानस आहे.’’
एमजी मोटर इंडियाच्या विद्यमान पोर्टफोलिओमध्ये हेक्टर सारख्या वेईकल्सचा समावेश आहे. या वेईकलचे नाव १९३०च्या दशकाच्या उत्तरार्धात निर्माण करण्यात आलेल्या दुसऱ्या महायुद्धातील लढाऊ ब्रिटीश बायप्लेनच्या नावावरून ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे, ग्लॉस्टरचे नाव ब्रिटनमध्ये बनवलेल्या आणि १९४१ मध्ये प्रथम उड्डाण केलेल्या जेट-इंजिन विमानाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.