रामटेक – राजू कापसे
आदिवासी गोवारी(गोंड गोवारी) समाजातील १०वी,१२वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पवनी त.रामटेक येथे गोंडवाना समाजभवन येथे संपन्न झाले.गोवारी समाज हा गरीब समाज आहे,गोवारी समाज आरक्षणाची लढाई लढत आहे आरक्षण नसल्यामुळे गोवारी समाजात उच्चशिक्षित लोक नगण्य आहे.शिक्षणाचा दर्जा उंच व्हावा,सत्कार समारंभ झाल्याने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते,सत्कार समारंभ झाल्याने समाज एकत्रित व विचार एकत्रित यायला मदत होते.
सर्व प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रथम पारितोषिक 93.80 टक्के गुण प्राप्तकरणारी कु.मांनशी बजरंग शेंद्रे,द्वितीय पारितोषिक 84.20 टक्के गुण प्राप्तकरणारी कू.गीतांजली उमेश कोहळे व तृतीय क्रमांक कू.प्रतिक्षा प्रभाकर खैरे 73.67 टक्के गुणप्राप्त यांना रोख व शिल्ड प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभ ला माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी हे उपस्थित होते.
सत्कार समरभाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती संजय नेवारे,एम्पोलिमेट संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष मुकुंदा नेहारे, गोवारी फाऊंडेशन रामटेक चे अध्यक्ष भास्कर राऊत,सचिव नंदकिशोर कोहळे,गोंड गोवारी सेवा मंडळ उपाध्यक्ष नामदेवराव ठाकरे,अरूनाताई चचाने(अमरावती),बजरंग शेंद्रे(केळझर,वर्धा),मारोती चौधरी(कोंढाली),राजेराम राऊत,
राजू नेवारे(मौदी)अनिल राऊत,गोपाल वरठी,शिवा शेंद्रे, भावराव शेंद्रे(तुमसर तालुका अध्यक्ष),रवींद्र कोहळे,लक्ष्मी राऊत,जीवन राऊत,महेंद्र सोनवाणे,संजय नेहारे,वसंता अंबाडारे,विनोद कोहळे,सुनील नेवारे,प्रदीप राऊत,विजय पोचपोंगले,राजू पोचपोंगळे,बलधारी नेवारे, ब्रम्हांद नेवारे,सुरेश शेंद्रे,सतीश गडे,मनोहर सोनवाने,पांडुरंग वाघाडे,रुपेश राऊत सह गोवारी (गोंडगोवारी) समाजातील विद्यार्थी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.