संत सावता माळी संस्था, काटोलचे आयोजन
विविध क्षेत्रातील 60 गुणवंतांचा सन्मान
प्रेरणादायी व्याख्याते डॉ.देवेंद्र काटे यांचे मार्गदर्शन
नरखेड – अतुल दंढारे
संत सावता माळी संस्था, काटोल कडून संतशिरोमणी सावता माळी पुण्यतिथी कार्यक्रम निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच महात्मा फुले सभागृह येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमेश कांबळे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रेरणादायी व्याख्याते देवेंद्र काटे,
गट विकास अधिकारी डॉ.निलेश वानखडे, संस्थेचे उपाध्यक्ष मोहन डांगोरे, सचिव तुलसीदास फुटाणे, सहसचिव प्रकाश मानेकर, कोषाध्यक्ष किरण डांगोरे, पं. स.सभापती संजय डांगोरे, युवा नेते विजय महाजन प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना देवेंद्र काटे म्हणाले, पालकांनी मुलांची तुलना शेजाऱ्यांसोबत करू नका.मुलांची आवड लक्षात घेऊन आवडत्या क्षेत्रात प्रवेश दयावा. नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा उत्तम मार्ग आहे.
मात्र प्रत्येक विद्यार्थी व पालकांना स्वतःच्या क्षमतेची जाणीव असली पाहिजे.जो व्यक्ती आयुष्यात ‘आत्मपरीक्षण’ करेल तोच यशस्वी होईल.म्हणून विविध कौशल्य आत्मसात करून यशाचा मार्ग सुकर करा असा कानमंत्र देण्यात आला.
जीवनात ध्येय ठरवून त्या ध्येयासाठी अपार कष्ट केलेत तर यश मिळते.चिकाटी,नियोजन व सातत्य त्रीसूत्रीचा जीवनात उपयोग केल्यास स्पर्धा परीक्षेचे शिखर गाठता येतो असे प्रतिपादन गटविकास अधिकारी निलेश वानखडे यांनी केले.
यावेळी चित्रकला, क्रीडा, माहिती व तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय, दहावी व बारावी क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच संस्थेचे माजी पदाधिकारी पंजाबराव दंढारे,रामरावजी भेलकर, रमेश तिजारे, ज्ञानेश्वर बोढाळे, विद्यानंद वरोकर, नंदकिशोर तिजारे, प्रा.अरविंद तरार, सुधाकर उमप यांचा शाल,श्रीफळ व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन डांगोरे, संचालन मोहनाताई खरबडे तर आभार प्रदर्शन हेमंत घोरसे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेचे सर्व संचालक व समाज बांधव- भगिनींनी सहकार्य केले.