रामटेक – राजु कापसे
रामटेक तालुका प्रतिनिधी एन एम एम बी फाउंडेशन, नमो नमो मोर्चा, बेटी बचाव बेटी पढाव रामटेक – पारशिवनी पत्रकार संघ, संताजी तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने शांती मंगल कार्यालय रामटेक येथे दहावी बारावी वर्गातील शांत परीक्षेत अव्वल घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी मिळवलेले खेळाडू उत्कृष्ट अधिकारी शिक्षक व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विजय हटवार यांनी सांगितले की चोखाळा या लहानश्या गावापासुन राष्ट्रीय स्तरापर्यंत सर्वांच्या आशिर्वादाने पोहोचले.रामटेक क्षेत्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रोत्साहान देण्यासाठी ते सदैव प्रयत्नरत आहेत. या कार्यक्रमातून 300 पेक्षा अधिक व्यक्तींच्या सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची अध्यक्षता परमात्मा एक आनंद धामचे संस्थापक लक्ष्मणराव बाबूजी मेहर यांनी केले कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री पुरस्कार (भारत सरकार ) प्राप्त परशुराम खुणे यांनी केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, कौशल्य विकास विभागाचे उपसंचालक उपसंचालक श्री पी टी देवतळे,
अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नागपूर संजय पाटील , माजी जिल्हा परिषद सिईओ श्री. सुधीर वाळके, संचालक सुधाकर डांगे, राजकुमार राठौर राष्ट्रीय महामंत्री अशोक राठौर राष्ट्रीय अध्यक्ष नमो नमो ओबीसी मोर्चा भारत पंकज राठौर राष्ट्रीय उपाध्यक्ष नमो नमो मोर्चा भारत निलेश अग्रवाल प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष नमो नमो मोर्चा भारत उद्योगपती जगदीश माली,
विनोद पाटील संतोष कुलकर्णी दिवाकर पाटणे शिंदे शिवसेना सिंधू दुर्ग संपरप्रमुख गोंदिया जिल्हा परिषद च्या सभापती छाया दसरे, माजी पंचायत समिती सभापती गुड्डू लिल्लारे, उद्योजक हेमंत नागपुरे बिल्डर्स जगदीश माली दिपांकर पाटने, पंचायत समिती चे उपसभावती नरेंद्र बंधाटे सहित विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सुभाष नागपुरे व अजय खेडगरकर यांनी केले यापूर्वी विजय हटवार यांनी डॉक्टर डे चे औचित्य साधून शहरातील डॉक्टरचा सत्कार केला उपजिल्हा रुग्णालय येथे दवाखाने फळ वाटप करण्यात आले यानंतर रियान हाॅस्पीटलचे संचालक प्रदीप बोरकर यांचाही सत्कार करण्यात आला त्यानंतर मनसर येथील वृद्धाश्रम येथे जाऊन फळ वाटप करण्यात आले.