Sunday, December 22, 2024
Homeराज्यआनंदी सभागृह रामटेक येथे गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, अधिकारी, पत्रकारांचा सत्कार...

आनंदी सभागृह रामटेक येथे गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, अधिकारी, पत्रकारांचा सत्कार…

रामटेक – राजू कापसे

एनएमएमबी फाउंडेशन, नमो नमो मोर्चा, बेटी बचाव बेटी पढाव, रामटेक पत्रकार संघ, संताजी तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमानेआनंदी सभागृह रामटेक येथे दहावी बारावी वर्गातील परीक्षेत अव्वल गुण घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, उत्कृष्ट खेळाडू विशेष कार्य करणारे अधिकारी, शिक्षक व पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नमो नमो चे राष्ट्रीय अधक्ष विजय हटवार म्हणाले की रामटेक क्षेत्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रोत्साहान व मार्गदर्शन देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमातून 400 पेक्षा अधिक व्यक्तींच्या सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची अध्यक्षता परमात्मा एक आनंद धामचे संस्थापक लक्ष्मणराव बाबूजी मेहर यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपआयुक्त संघमित्रा ढोके, राष्ट्रीय अध्यक्ष नमो नमोचे विजय हटवार, प्रसुराम खुने, शिला हटवार, छाया दसरे, आत्माराम दसरे, सतीश दमाहे, नितेश कुंभार, नानाभाऊ उराडे, हेमंत नागपुरे, राजेन्द्र बावनकुळे, रमाकांत कुंभलकर, मुनि महाराज, तहसीलदार रमेश कोलापे सहित आदी मोठ्या सांखेत उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन कांचनमाला माकडे, व अजय खेडगरकर यांनी केले. आभार नत्थु घरजाडे यानी केले।

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: