रामटेक – राजू कापसे
दि.९ आक्टोबर ला रामटेक येथे मेरी माटी मेरा देश अमृत कलश यात्रा अंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार व दक्षिण मध्य सांस्कृतिक विभाग नागपूर यांच्या माध्यमातून शाहीर अलंकार टेंभुर्णे व संच यांनी मेरी माटी मेरा देश विरो को नमन माटी को वंदन हे कार्यक्रम सादर केले.
शाहीर अलंकार टेंभुर्णे आणि आपल्या गीतातून वीर जवानांना नमन केले.व एक सामाजिक व देशा अभिमानाचा संदेश देऊन वीरांची शौर्यगाथा गायली.
ह्या कार्यक्रमा प्रसंगी नगरधन पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्टर तौफिक अन्सारी हे प्रामुख्याने उपस्थित होते तर नंदी वर्धन शाळेचे मुख्याध्यापिका व शिक्षक कर्मचारी वृंद व संपूर्ण विद्यार्थी त्याचप्रमाणे शेकडोच्या संख्येने नागरिक हा कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि वीर जवानाची शौर्यगाथा ऐकून ते अत्यंत प्रभावित झाले. अशाप्रकारे शाहीर अलंकार जी. टेंभुर्णे आणि संच यांनी आपल्या प्रबोधन पर कार्यक्रम सादरीकरणा नंतर सर्व जनतेचे आभार मानले.