Tuesday, December 24, 2024
Homeराज्यएटापल्ली तालुक्यातील ५०० किशोवयीन मुलींना देण्यात आले मासिक पाळी व्यवस्थापन, समुपदेशन व...

एटापल्ली तालुक्यातील ५०० किशोवयीन मुलींना देण्यात आले मासिक पाळी व्यवस्थापन, समुपदेशन व प्रशिक्षण…

गडचिरोली:27डिसेंबर

लॉईडस् मेटलस् आणि एनर्जी लि. सुरजागड व त्रिशरन एन्लायटनमेंट फाउंडेशन , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा तोडसा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, विनोबा भावे आश्रम शाळा हेडरी, जि. प. हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय, एटापल्ली जि. गडचिरोली, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, एटापल्ली. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वसतिगृह एटापल्ली येथे प्रशिक्षण कार्यशाळेत एकुण ५०० किशोरवयीन मुलींना मोफत मासिक पाळी व्यवस्थापन समुपदेशन व प्रशिक्षण देण्यात आले .

या अतिसंवेदनशील व आरोग्य दृष्टीने महत्वूर्ण असलेल्या कार्यशाळेस विद्यार्थिनींनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून आपल्या आरोग्या विषयी माहिती जाणून घेतली. या कार्यशाळेत संस्थेच्या विकासदूत तरुणींनी मासिक पाळी विषयी समज- गैरसमज, अंधश्रद्धा, रूढी परंपरा याबाबत पडदा टाकणारे पथनाट्य सादर केले. या विद्यार्थिनींना या उपक्रमात संस्थेने किशोरवयीन मुलींना सोप्या पद्धतीने समजावे व मासिक पाळी बद्दल त्यांचे गैरसमज दूर व्हावेत यासाठी संस्थेने तयार केलेले मासिक पाळी दरम्यान काळजी कशी घ्यावी याबाबत चे चित्रमय पुस्तक देखील देण्यात आले.

सोबत मुलींना ६ महिने पुरतील एवढे मोफत सॅनिटरी नॅपकिन्स चे देखील मुलींना वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या प्रशिक्षिकांकडून उपस्थित मुलींचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. तसेच याविषयी लाज बाळगणाऱ्या मुलींना लेखी प्रश्न मागवून त्यांच्या शंकेचे निरसन करण्यात आले. या मासिक पाळी व्यवस्थापन, समुपदेश, प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा तोडसा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली. येथे उज्वल उके (I.A.S.) माजी सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव, तथा सर्वोच्च न्यायालय समिती सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन शुभम गुप्ता साहेब,उप-विभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एटापल्ली, यांनी या कार्यशाळेचे अध्यक्षपद भूषवले,

कार्यशाळेचे दीप प्रज्वलन : प्रज्ञा वाघमारे व्यवस्थापकीय संचालक त्रिशरन फाउंडेशन,पुणे. यांच्या हस्ते करण्यात आले. विनोबा भावे आदिवासी आश्रम शाळा येथे घेण्यात आलेल्या कार्यशाळेत अध्यक्षस्थानी डॉ गोपाल रॉय, वैद्यकीय अधीक्षक, लॉईडस् एनर्जी लि. सुरजागड. हे होते , प्रमुख पाहुणे म्हणून बाबूराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी हे होते. यावेळी उपस्थित मान्यवरां सोबत, प्रशांत वाघमारे, प्रकल्प राज्य व्यवस्थापक, त्रिशरन फाउंडेशन, पुणे. , श्री. शीतल कांबळे, पुणे विभागीय व्यवस्थापक त्रिशरन फाउंडेशन, पुणे, श्री. सचिन कालेश्वर गडचिरोली जिल्हा समन्वयक त्रिशरन फाउंडेशन, कु. रचना कांबळे , पुणे जिल्हा समन्वयक त्रिशरन फाउंडेशन, कु. अर्चना बनकर विकासदूत, कु. वीरांगना नैताम,विकासदूत त्रिशरन फाउंडेशन एटापल्ली, कु. पायल कुंभारे, विकासदूत त्रिशरन फाउंडेशन एटापल्ली, विनोबा भावे आदिवासी आश्रम शाळा हेडरी चे मुख्याध्यापक श्री. इमले सर, अधीक्षक – श्री. गेडाम सर,या कार्यशाळेत शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा तोडसा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली. येथील शाळेचे श्री. लसनकर सर, कु. मरसकोल्हे मॅडम, कु. झाडे मॅडम, कु. नीता नैताम,जि.प. हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय , एटापल्ली जि. गडचिरोली. येथील शिक्षिका कु. छाया श्रीरामे, कु.आरती राठोड, कु. अश्विनी हरनखेडे, कु. प्राची बागडे.

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय एटापल्ली येथील मुख्याध्यापिका कु. पौर्णिमा शिम्पी , व इतर सहशिक्षिका कु. सरोज कुळमेथे, कु. गायत्री करोडे,कु. स्त्रिता राऊत, कु. उमादेवी बुरादे ,कु. उमादेवी बुराडे, कु. प्रांजली शेट्टे, कु.अश्विनी बुराडे

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वसतिगृह एटापल्ली येथील अधीक्षिका यांनी सर्वोतपरी मदत करून हे प्रशिक्षण यशस्वी करण्यात मदत केली हातभार लावला. संस्थे कडून विद्यार्थ्यांकडून लिहून घेण्यात आलेल्या अभिप्राय फॉर्म मध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण त्यांनी पहिल्यांदाच घेतले असून या प्रशिक्षणामुळे त्यांना आवश्यक ती माहिती मिळून त्यांचे अनेक गैरसमज दूर झाले असल्या बाबत नमुद केले आहे. तसेच असे प्रशिक्षण गावात देखील घेऊन इतर मुली व महिलांना त्याचा लाभ व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: