अंगठ्या, ब्रेसलेट, चेन, स्टड कानातले, हिरे आणि सोन्याच्या श्रेणीतील पेंडंट यांचा समावेश
मेलोरा (www.melorra.com) हा भारतातील झपाट्याने विकसित होत असलेला डी२सी ब्रॅण्ड विशेषत: समकालीन, स्टायलिश पुरूषांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या त्यांच्या नवीन कलेक्शनसह मेन्स ज्वेलरी विभागात प्रवेश करत आपला पोर्टफोलिओ वाढवण्यास सज्ज आहे.
चेन, ब्रेसलेट, स्टड कानातले, पेंडंट आणि अंगठ्यांचा समावेश असलेले हे कलेक्शन हिरे व सोन्याच्या (१४ कॅरेट, १८ कॅरेट व २२ कॅरेट) श्रेणीमध्ये येईल. ६,००० रूपयांपासून किंमत सुरू होणाऱ्या या कलेक्शनमध्ये पोत, भौमितिक स्लिट्स, किमान नमुने, तसेच मल्टी-टोन्ड (पिवळ्या व पांढऱ्या सोन्याचे मिश्रण) आणि क्लासिक शैलींचा समावेश असेल.
मेलोराचे नवीन कलेक्शन आधुनिक, बोल्ड व वैविध्यपूर्ण आहे आणि परवडणाऱ्या, रोजच्या पोशाखांसाठी योग्य व अद्वितीय अशा समकालीन डिझाइन्सद्वारे पुरूषांना अॅक्सेसरीझ करण्याचे उद्दिष्ट आहे. दागिन्यांची रचना पुरुषांच्या पोशाखांमध्ये अधोरेखित शैलीची भर करण्यासाठी करण्यात आली आहे, ज्यामुळे ते सामान्य ते ट्रेंडी आणि मोडीश आहेत. नवीन कलेक्शन मेलोराच्या २३ एक्स्पेरिअन्स सेंटर्समध्ये उपलब्ध आहे आणि २६,००० हून अधिक ठिकाणी वितरित केले जाऊ शकते.
मेलोराच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सरोजा येरामिल्ली म्हणाल्या, ‘‘हे नवीन कलेक्शन मेन्स ज्वेलरी विभागामधील आमच्या विस्तारीकरणाला सादर करते आणि आमच्या स्थापनेपासून आम्ही संपादित केलेल्या अनेक महत्त्वपूर्ण टप्प्यांपैकी एक आहे. दागिन्यांची शैली समकालीन वॉर्डरोब लक्षात घेऊन करण्यात आली आहे आणि दररोजच्या पोशाखांना साजेशी अशी आहे. आम्ही आमच्या पुरुष ग्राहकांना त्यांच्या शैली, व्यक्तिमत्व आणि प्राधान्यांनुसार योग्य दागिने शोधण्यामध्ये मदत करण्यास उत्सुक आहोत.’’
नवोन्मेष्कारी दृष्टीकोन व आधुनिक डिझाइन्ससाठी ओळखला जाणारा हा ब्रॅण्ड प्रत्येक प्रसंगाला पूरक अशा दागिन्यांच्या शोधात असलेल्यांसाठी परिपूर्ण पर्याय आहे. दर आठवड्याला ७५ डिझाइन्स लाँच केली जात असल्यामुळे मेलोरा प्रत्येक भारतीयाला आपली विस्तृत श्रेणी सहज उपलब्ध करून देऊ शकते. यामुळे अगदी दुर्गम बाजारपेठांमध्ये पोहोचण्याचे ब्रॅण्डचे उद्दिष्ट साध्य होत आहे. अगदी दूरवर राहणाऱ्यांनाही ट्रेण्डी परवडण्याजोगे दागिने घरपोच देता येतील, याची खात्री ब्रॅण्ड घेत आहे.