Monday, December 23, 2024
Homeव्यापारमेलोरा ने फेस्टिव कलेक्शन लॉन्च...२२ कॅरेट सोन्यातील १८००० हून अधिक ट्रेण्डी डिझाइन्स...

मेलोरा ने फेस्टिव कलेक्शन लॉन्च…२२ कॅरेट सोन्यातील १८००० हून अधिक ट्रेण्डी डिझाइन्स…

मेलोरा या ट्रेण्डी, कमी वजनाच्या बीआयएस हॉलमार्कयुक्त सोन्याचे दागिने परवडण्याजोग्या दरात उपलब्ध करून देणाऱ्या तसेच भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या डीटूसी ब्रॅण्ड्सने सणासुदीच्या काळाचा उत्साह आणि चैतन्य चपखलपणे पकडणारी ४ कलेक्शन्स लॉन्च केली आहेत. 

आपल्या उद्दिष्टाला जागत तसेच मंगल अशा सणासुदीचा काळ अधिक आनंददायी करत ब्रॅण्ड दर शुक्रवारी एक नवीन कलेक्शन बाजारात आणणार आहे. यामध्ये सोन्याच्या व हिऱ्याच्या दागिन्यांच्‍या एकूण ७५ हून अधिक डिझाइन्स आहेत. ब्रॅण्डने आपले नवीन उत्सवी जाहिरात अभियान ‘हरघरमेलोरा’ नुकतीच प्रसारित केली. आपल्या विस्तृत श्रेणीतून व डिझाइन्समधून सणासुदीच्या प्रत्येक दिवसासाठी दागिने निवडून प्रत्येक भारतीय स्त्रीचे सौंदर्य वाढवण्याचे वचन या जाहिरातींतून ब्रॅण्ड देत आहे.

ब्रॅण्डची २३ एक्स्पिरिअन्स सेंटर्स आहेत आणि आर्थिक वर्ष २६ पर्यंत भारतभरात ३५० एक्स्पिरिअन्स सेंटर्स सुरू करण्यास ब्रॅण्ड उत्सुक आहे. दागिन्यांना स्पर्श करण्याची, त्यांचे सौंदर्य अनुभवण्याची, ते घालून बघण्याची संधी मिळाल्यामुळे दागिने निवडण्याचा व खरेदी करण्याचा अखंडित अनुभव ग्राहकाला देता येतो.

त्यामुळेच दररोजच्या वापरातील सोन्याच्या दागिन्यांसाठीही एक पसंतीचा ब्रॅण्ड म्हणून मेलोरा वेगाने उदयाला येत आहे. ब्रॅण्डने भारतातील २६,०००हून अधिक पिनकोड्सच्या क्षेत्रांत तसेच यूएई, अमेरिका, ब्रिटन व युरोपमधील अनेक देशांत आपली उत्पादने पोहोचवण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय साध्य केले आहे आणि ब्रॅण्डचा आणखीही विस्तार होत आहे.

मेलोराच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सरोजा येरामिली म्हणाल्या, “उत्सवी मोसमाच्या साजरीकरणाचा भाग होण्यासाठी ४ वेगवेगळी कलेक्शन्स बाजारात आणण्यास मेलोरा सज्ज आहे. स्त्रिया रोजच्या कपड्यांसोबत वापरू शकतील अशा कमी वजनाच्या सुवर्णअलंकारांची मागणी वाढत असल्याचे आम्हाला दिसत आहे. ‘हरघरमेलोरा’ हे आमचे अभियान याच दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.

आम्हाला सर्वांत दुर्गम भागातील बाजारपेठांपर्यंत पोहोचायचे आहे आणि आमच्या एकंदर उत्पादनश्रेणीची उपलब्धता ग्राहकांच्या मोठ्या वर्गासाठी वाढवायची आहे. आमच्‍या डिझाइन्स फॅशनच्या जागतिक प्रवाहांपासून प्रेरित आहेत आणि प्रत्येक प्रसंगासाठी ते चपखल आहेत, ते सणासुदीसाठीही शोभणारे आहेत आणि दैनंदिन वापरासाठीही उत्तम आहेत.

आम्ही दर शुक्रवारी नवीन कलेक्शन बाजारात आणत आहोत आणि सोने व हिऱ्यांमध्ये १८,००० हून अधिक डिझाइन्स देऊ करत आहोत. भारतीयांचे सोन्यावरील प्रेम आणि धारणा व अभिरूचीमध्ये होत असलेले बदल यांची सांगड घालणे आमचे उद्दिष्ट आहे. याचे सुंदर प्रतिबिंब आमच्या डिझाइन्समध्ये उमटत आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: