सांगली – ज्योती मोरे
वारकरी सांप्रदायाचं साहित्य हे मानवतावादी साहित्य असून वारकरी सांप्रदायाची चेष्टा मस्करी कधीही होता कामा नये.वारकऱ्यांनीही कोणत्याही निमित्तानं राजकारण्यांसमोर मर्यादा सोडून नतमस्तक होऊ नये,व्यसनमुक्ती विभागाकडून खर्च केले जाणारे कोट्यावधी रुपये अखंड हरिनाम सप्ताहासह दिंडीसाठी देण्यात यावेत,प्रत्येक गावात टाळ,
विना, पखवाज दिला पाहिजे,शिवाय वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्थांना दरमहा एक लाख रुपये अनुदान देण्यात यावं. या मागण्यांसाठी लवकरच वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं, तालुका स्तरावर बैठका आयोजित करणार असल्याचं अध्यक्ष विठ्ठलराव पाटील यांनी सांगितले.