Monday, December 23, 2024
Homeराज्यआगामी गणेशोत्सवा संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत कृष्णा मॅरेज...

आगामी गणेशोत्सवा संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत कृष्णा मॅरेज हॉलमध्ये गणेश मंडळांसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक संपन्न…

सांगली – ज्योती मोरे

कायदा आणि नियमांचे शंभर टक्के पालन करून गणेशोत्सव साजरा करावा अशा सूचना जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह शांतता कमिटी पोलीस प्रशासन तसेच जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या आहेत.

दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर बैठका घेण्यात आल्या असून ,आलेल्या सूचना संबंधित विभागाकडे देण्यात आल्या आहेत. त्या त्या विभागाकडून त्यांची पूर्तता करून घ्यायची तयारी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी यावेळी बोलताना दिली.

सदर बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, पोलीस उपाधीक्षक सुरेखा दुगे, प्रत्येक तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक ,महानगरपालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, मूर्तिकार, डॉल्बीचालक, बँड संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: