गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
नागपूर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आज माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नागपूर येथील विजयगड, शासकीय निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी नागपूर चे निरीक्षक माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर, नरेश अरसाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नागपूर ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन मजबूत करणे, जनतेच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्यावर भर देणे व विकासाच्या मुद्द्यांवर भर देवून शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी काम सर्वांनी करावे असे मार्गदर्शन अजितदादा पवार यांनी केली.
नागपूर चे निरीक्षक माजी आमदार राजेंद्र जैन यांनी नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करुन पक्षाची वाढ व विस्तार करण्यास जोमाने कामाला लागू असे आश्वासन पदाधिकाऱ्यांच्या वतीने दिले. यावेळी भागेश्वर फेंडर, सचिन चव्हाण, सुधाकर तिबोले, भुजंग भोजनकर, नरहरी. देव्हाडे, पांडुरंग गायकी सहीत मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.