Monday, December 23, 2024
Homeराजकीयविश्रामबाग मधील रेल्वे गेट संबंधात खासदार संजय पाटील यांची भेट...

विश्रामबाग मधील रेल्वे गेट संबंधात खासदार संजय पाटील यांची भेट…

सांगली – ज्योती मोरे.

विश्रामबाग रेल्वे फाठक वारणाली येथील रेल्वे पाठक कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रशासनाचा डाव आहे,त्यामुळे प्रभागातिल नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे,त्यासाठी आज खासदार मा.संजय काका पाटील यांनी भेट दिली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या,त्यातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी निवेदन दिले यामुळे १)शाळकरी मुलांना ज्येष्ठ नागरिकांना व महिला भगिनींना ओवर ब्रिजवरून जाण्यासाठी खूप मोठी अडचण होणार आहे.

२) सुमारे 15 ते 20 हजार प्रभावित नागरिक विद्यानगर विद्या विहार कॉलनी वारणाली ZP कॉलनी,जयहिंद कॉलनी, पोलीस लाईन इत्यादी नागरिक प्रभावित होत आहेत.

३) स्थानिक रेल्वे बीज खालील नागरिकांना टू व्हीलर साठीचा मार्ग आवश्यक आहे ती मागणी केली.

४) सदर नागरिकांच्या गंभीर मागणीचा विचार घेऊन खासदार मा.संजयकाका पाटील यांनी भारतीय रेल्वेमंत्री यांच्याशी बोलून घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले व उद्या त्वरित जिल्हाअधिकारी कार्यालयामध्ये सर्व अधिकरण्यासमवेत मीटिंग लाऊन योग्य तो मार्ग काढू असे सांगितले.

यावेळी माजी आमदार शरद पाटील सर,नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने,रवी खराडे,नगरसेवक राजेंद्र कुंभार,शशिकांत गायकवाड,कल्पना कोळेकर,अतुल माने,संतोष पाटील,प्रदीप साळवी,सचिन लाड सर,सोनाली सगरे,विजय जाधव,दत्ता मांडवकर,प्रसाद वळकुंडे,प्रभाकर स्वामी,विजय कागे,विपुल कोरे,व आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: