नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मीनल करनवाल यांनी कार्यभार स्वीकारला असून त्या आज शनिवार दिनांक 22 जुलै रोजी रुजू झाल्या आहेत.
यापूर्वी मीनल करनवाल ह्या नंदुरबार येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तथा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. त्या 2019 बॅचच्या आयएएस आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची पदोन्नतीने लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. या रिक्त जागी शासनाने मीनल करनवाल यांची नियुक्ती केली. आज त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी बंडू अंदुरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक अभय नलावडे, बालाजी नागमवाड, जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख, अधिकारी यांची उपस्थिती होती.