सांगली – ज्योती मोरे.
विजयनगर कोर्टासमोरील नाल्यावर आणि विहिरीवर बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेल्या इमारतीवरील महानगरपालिकेने तसेच जिल्हा प्रशासनाने लांबवलेल्या कारवाईबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 24 जुलैपासून स्थानिक नागरिक प्रकाश चव्हाण, मीना तांदळे सह इतर काही नागरिक आमरण उपोषणास बसले होते.
उपोषण सुरू झाल्यानंतर दोन ते तीन दिवसातच मीना तांदळे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान काल रात्री हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
दरम्यान,महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे यांनी तोंडी आश्वासन देऊन हे उपोषण मागे घेण्यास भाग पाडल्याचे उपोषणकर्ते प्रकाश चव्हाण यांनी म्हटले आहे.