MEA : इस्लामाबादमधील ब्रिटनच्या उच्चायुक्त जेन मॅरियट यांनी अलीकडेच परराष्ट्र कार्यालयाच्या अधिकाऱ्यासह पाकव्याप्त काश्मीरला भेट दिली. यावर भारताने शनिवारी तीव्र आक्षेप व्यक्त केला. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सांगितले की त्यांनी या प्रकरणावर नवी दिल्लीतील ब्रिटीश उच्चायुक्तांकडे तीव्र निषेध नोंदवला आहे.
“भारताने बुधवारी एका अधिकार्यासह पाकव्याप्त काश्मीर (pok) मधील यूके उच्चायुक्तांच्या अत्यंत आक्षेपार्ह भेटीची गंभीर दखल घेतली आहे. भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे हे उल्लंघन स्वीकारले जाऊ शकत नाही,” एमईएने एका निवेदनात म्हटले आहे.
मंत्रालयाने सांगितले की, परराष्ट्र सचिवांनी या प्रकरणाचा भारतातील ब्रिटिश उच्चायुक्तांकडे तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मंत्रालय पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहेत आणि नेहमीच राहतील.
त्याचप्रमाणे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्लामाबादमधील अमेरिकेचे राजदूत डोनाल्ड ब्लूम यांनीही पाकव्याप्त काश्मीरला भेट दिली होती. तेव्हाही नवी दिल्लीने वॉशिंग्टनकडे तीव्र आक्षेप नोंदवला होता. भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला आपल्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याचे आवाहन केले होते.
India protests visit of British High Commissioner in Islamabad to Pakistan occupied Kashmir:https://t.co/vd4WqODznI pic.twitter.com/sYwkMUjAkr
— Randhir Jaiswal (@MEAIndia) January 13, 2024