Monday, December 23, 2024
HomeMarathi News TodayMc Stan | एमसी स्टॅनचे नशीब उघडले…शाहरुख खानच्या 'या' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करणार...

Mc Stan | एमसी स्टॅनचे नशीब उघडले…शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण?

बिग बॉस 16 चे विजेतेपद पटकावल्यानंतर Mc Stan एमसी स्टेनची लोकप्रियता आणखी वाढली आहे. शोची ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत तो अनेक दिग्गजांना कडवी टक्कर देत आहे. दरम्यान, तो लवकरच Bollywood बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार असल्याची बातमी आहे.

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर स्टेन लवकरच फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणार आहे. Shah Rukh शाहरुखच्या आगामी चित्रपटासाठी निर्मात्यांनी त्याच्याशी संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे. त्याला Jawan जवान चित्रपटासाठी संपर्क करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही बातमी समोर आल्यानंतर स्टेनच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाहीये. ही बातमी एका एंटरटेनमेंट न्यूज पोर्टलच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आली आहे. मात्र, या वृत्ताला निर्माते किंवा स्टॅनकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच, स्टॅन या चित्रपटात अभिनय करणार की गाणार हे अद्याप कळलेले नाही.

विशेष म्हणजे पठाणच्या शानदार यशानंतर लोक शाहरुख खानच्या जवान चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात किंग खान व्यतिरिक्त विजय सेतुपती आणि नयनतारा सारखे सुपरस्टार देखील आहेत. तमिळ चित्रपटांचे सुपरहिट दिग्दर्शक एटली याने याचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी त्याने दलपती विजयसोबत अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे केले आहेत. जवान 2 जूनला रिलीज होणार होता. मात्र, आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: