Monday, December 23, 2024
Homeराज्यमयंक देशमुख यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्य सचिव पदी नियुक्ती...

मयंक देशमुख यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्य सचिव पदी नियुक्ती…

रामटेक – राजू कापसे

मंयक मनोज देशमुख यांची महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसच्या राज्य सचिव पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक कॉग्रेस पार्टीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे प्रभारी उदय भाणू, सहाय्यक प्रभारी ईहसान खान, कुमार रोहीत नलमवार आणि श्रीनिवास नलमवार यांनी मयंक देशमुख यांची महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसच्या राज्य सचिव पदी नियुक्ती केलेली आहे.

यावेळी रामटेकचे माजी आमदार आनंदरावजी देशमुख, राष्ट्रीय महासचिव अजित सिंग, जनरल सेक्रेटरी आसीफ शेख, युवा नेता, राष्ट्रीय आदर्श विद्यालय शिक्षण मंडळ, रामटेकचे कोषाध्यक्ष अंशुल देशमुख, सदस्य घनश्यामजी बर्वे, नागपूर जिल्हा (ग्रामीण) युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष स्नेहदिप वाघमारे आणि बहुसंख्य स्थानिक युवक प्रामुख्याने उपस्थित होते.

नियुक्ति झाल्या बद्दल मयंक देशमुख यानी कॉग्रेस अध्यक्ष मल्लीकाअर्जुन खरगे, माजी अध्यक्षा खा. सोनियाजी गांधी, खासदार राहुल गांधी, राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीनीवास बी. व्ही. आणि महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष कुणाल राउत यांचे आभार व्यक्त केले

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: