Mayank Agarwal : मंगळवारी 30 जानेवारीच्या संध्याकाळी भारतीय क्रिकेटर मयंक अग्रवालच्या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. टीम इंडियाच्या या बॅट्समनला अचानक फ्लाइटमधून उतरवण्यात आलं आणि हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. त्रिपुराविरुद्ध रणजी सामना खेळल्यानंतर मयंक आपल्या कर्नाटक संघासह आगरतळाहून सुरतला जात होता. अचानक त्याने तिथे सीटवर ठेवलेले पाणी प्यायले. यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने विमानातून उतरवून रुग्णालयात नेण्यात आले. आता याप्रकरणी त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनने मोठा खुलासा केला आहे. त्यांनी क्रिकेटपटूच्या प्रकृतीबाबतही सांगितले.
मयंक अग्रवालने ‘विष’ प्यायले होते का?
भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवालने सीटवर येताच तिथे ठेवलेल्या बाटलीतून पाणी प्यायल्याने त्याची प्रकृती खालावली. तोंडात जळजळ होत होती. त्याच्या घशाचाही त्रास होता. यानंतर, त्याने प्यायलेल्या पाण्यात कदाचित काही विषारी द्रव्य असावे, असे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. यानंतर त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सचिव बासुदेव चक्रवर्ती यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्याने असेही सांगितले की क्रिकेटरचे संपूर्ण तोंड सुजले होते आणि त्याला बोलताही येत नव्हते.
सचिव म्हणाले, ‘मला फोन आला की मयंक अग्रवाल आपत्कालीन परिस्थितीत दाखल झाला आहे. त्याने आपल्या सीटवर ठेवलेल्या बाटलीतून पाणी प्यायले आणि त्यानंतर त्याचे तोंड जळू लागले आणि त्याच्या घशात त्रास झाला. कदाचित पाणी ऍसिडिक होते, त्याला काही वेळातच रुग्णालयात नेण्यात आले. आता तो धोक्याबाहेर आहे पण त्याचा चेहरा सुजला आहे आणि त्याला बोलताही येत नव्हते. त्याला बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्जही मिळू शकतो, असे क्रिकबझने सांगितले. अन्य माहितीनुसार, तो सध्याच्या रणजी ट्रॉफीचा पुढील सामना खेळू शकणार नाही. तो कर्नाटक संघाचा कर्णधार असून जबरदस्त फॉर्मात आहे. चार सामन्यांत दोन शतकेही झळकावली.
#WATCH | Agartala: On Indian Cricketer Mayank Agarwal's health, Tripura Cricket Association Working Secretary Basudeb Chakraborty says, "I received a phone call that Mayank Agarwal is admitted in an emergency… Mayank Agarwal drank a liquid from a bottle thinking that it was… pic.twitter.com/POTSWMX3dx
— ANI (@ANI) January 30, 2024