राजु कापसे प्रतिनिधी
नागपूर : तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे दि. १२ सप्टेंबर पासून पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांना दर महिन्याला मासिक वेतन, राहणीमान भत्ता, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, ग्राम पंचायत कडून दिल्या जात नाही. जवळपास मागील ६ महिने पूर्वी पासून मिळालेला नाही, याबाबत पंचायत समितीला वारंवार पत्र देऊन सुधा कोणतीही योग्य कारवाई झाली नसल्याने. आंदोलन सुरू केले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बॅनरखाली सुरू झालेल्या या आंदोलना अंतर्गत मागण्या
१) १ एप्रिल २०२४ ते ऑगस्ट २०२४ पर्यंत पगार मिळणे बाबत
२) अपघात विमा उत्तरवणे बाबत
३) जलसुरक्षक यांना सुरक्षा किट रेनकोट, टॉर्च, लॉग, बूट. स्वर, हातमोजे या सर्व साहिल्यासाठी एजन्सी नेमण्याबाबत
४) ग्रामपंचायत कडून थकीत राहणीमान भत्ता जीपीएफ पगार मिळणेबाबत
५) सचिव लॉगिन व व्हिडीओ लॉगिन मधून अपलोड न झालेले पगार हे ग्रामपंचायत कडून देणेबाबत
६) प्रत्येक ग्रामपंचायतला पाणीपुरवठा कर्मचारी यांना सायकल देण्याबाबत
७) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय पंच म्हणून नेमणूक न करण्याबाबत
८) ग्रामपंचायत कर्मचारी यांचा 50% 25% ग्रामपंचायत हिस्याचे किमान वेतन
आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू आहे. पं.स. सभापती स्वप्नील श्रावणकर यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन लवकरात लवकर हा प्रश्न बीडीओ च्या माध्यमातून सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी पंचायत समिती सदस्य दीपक गेडाम, तालुका ग्राम विस्तार अधिकारी शरद दोनोडे उपस्थित होते. सभापती स्वप्नील श्रावणकर यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे मौदा तालुकाध्यक्ष सतीश वाघमारे, उपाध्यक्ष परमवीर गजभिये, सचिव रजत बांगडकर, दिपाली तांबडे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.