अहेरी – मिलिंद खोंड
रविवार 7 जानेवारी 2024 ला आल्लापल्ली येथील ग्रीनलँड इंग्लिश मिडियम स्कूल च्या पटांगणावर महिला समन्वय समितीतर्फे मातृ शक्ती संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख कार्यवाहीका अन्नदानम सीतागायत्रीजी, निरामय बहुउद्देशीय सेवा संस्था नागपूरच्या डॉ. उर्मिलाताई क्षीरसागर तर प्रमुख अतिथी म्हणून अहेरी इस्टेटच्या राजमाता राणी रुक्मिणी देवी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी भामरागड रोशना चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक करिश्मा मोरे आदींची उपस्थिती राहणार आहे.
या महिला सम्मेलनात भारतीय स्त्री दर्शन, महिलांच्या स्थानिक समस्या, शैक्षणिक आरोग्य, संरक्षण ,देशाच्या विकासात महिलांची भूमिका आदी.विषयावर प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
त्याचसोबत या ठिकाणी स्वदेशी उत्पादनांचे व वनवासी हस्तकलांचे स्टॉल व प्रदर्शनी राहणार आहे.दिवसभर विविध सत्रात महिलांच्या विविध विषयांवर ऊहापोह होणार आहे. या संमेलनात अहेरी उपविभागातील मोठ्या प्रमाणावर मातृशक्तीने उपस्थित दर्शवावी असे आवाहन महिला समन्वय समिती तर्फे करण्यात येत आहे.