अकोला शहरातील जुने शहर परिसरात दिनांक १३.०५.२०२३ रोजी ११ वाजताच्या दरम्यान दोन गटात दंगल व तुफान दगडफेक झाली होती, या दंगलीचे २ मुख्य आरोपी यांना अटक केली आहे. अकोला येथील करण शाहू नावाच्या इसमाने विशिष्ट धर्माचे दैवता बाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयाचे इंस्टाग्राम वर वायरल करून मुस्लीम समाजाचे भावना दुखावल्या अशी तक्रार अरबाज खान नासीर खान वय २३ वर्षे रा. अकोला याने तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला येथे दिली होती. त्यावर करण शाह इसमा विरुध्द पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला येथे अपराध क्रमांक १९२ / २०२३ कलम १५३ (अ),२९५(अ),१८८, १२० (अ), ५०५ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
मुस्लीम समाजाचे लोकांनी दिनांक १३.०५.२०२३ रोजी रात्री गैर कायद्याची मंडळी जमवुन ‘अल्ला की शान में गुस्ताकी हो गई’ या कारणामुळे कट कारस्थान रचुन ठिकठिकाणी जुने शहर परीसरातील, हरीहर पेठ, पोळा चौक व इतर ठिकाणी जाळपोळ व दगड फेक करून हिंदु समाजाच्या लोकांच्या घरात घुसुन शासकीय व सार्वजनिक मालमत्तेचे मोठया प्रमाणात नुकसान करून लोखंडी पाईप व काठ्यांनी हिंदु समाजाच्या लोकांना व पोलीसांना मारहाण केली. या मारहाणी मध्ये विलास महादेवराव गायकवाड वय ४० वर्षे रा. हरीहर पेठ जुने शहर अकोला या इसमाचा मृत्यु झाला.
काही लोकांनी घडवुन आणलेल्या दंगली बाबत पोलीस स्टेशन जुने शहर येथे १) १५० / २०२३ कलम १४३ ते १४९, ३०७, ४३५, ३५३, ३३३, ३३६, ३३७, ४२७ भादंवि सह कलम ७ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट सह कलम ३, ४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायदा २) १५१ / २०२३ कलम १४३, १४७, १४८, १४९, ४३५, ४३६, ४२७ भादंवि सह कलम ७ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट सह कलम ३,४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायदा ३) १५२ / २०२३ कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, भादंवि ४) १५३ / २०२३ कलम १४३ ते १४९, ४३५, ४२७, २९५ भादंवि सह कलम ७ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट सह कलम ३,४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायदा अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले असुन नमुद गुन्हयात एकुण १०२ आरोपीतांना अटक करून सदर गुन्हयात ०६ अल्पवयीन (मुले) यांचा सहभाग असल्याचे तपास निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस स्टेशन रामदास पेठ येथे दाखल अपराध क्रमांक १९२ / २०२३ कलम १५३ (अ), २९५ (अ), १८८, १२० (अ), ५०५ भादंवि चे तपासात असे निष्पन्न झाले की सदर गुन्हयांतील फिर्यादी अरबाज खान नासीर खान वय २३ वर्षे रा. अकोला व एक इसम या दोघांनी एकमेकांचे मोबाईल फोन व्दारे सोशल मिडीया वर चॅटींग करून ती चॅटींग मुस्लीम समाजाच्या सोशल मेडीया गृपवर प्रसारीत केली व वैयक्तीक चॅटींग सार्वजनिक केली. अल्ला की शान मै गुस्ताकी हो गई’ असे खोटी माहीती प्रसारीत करून कट कारस्थान रचुन मुस्लीम समाजाचे लोकांना एकत्र बोलावुन दंगल घडवुन आणली. सदर गुन्हयात ४४ आरोपी अटक करण्यात आले आहे.
वास्तवीक पाहता करण शाहु नामक इसमाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसुन या सर्व गोष्टीना अरबाज खान नासीर खान जबाबदार आहे. असे तपासात निष्पन्न झाले. दंगल घडवुन राउत आणणारे एकुण १४८ आरोपीना अटक करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही अकोला पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक मोनिका, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सुभाष दुधगांवकर, यांचे मार्गदर्शनात व पोलीस अमलदार यांनी केली.