Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यदानापुर येथे मस्तान शाह वली ऊरुस उत्सव संपन्न...

दानापुर येथे मस्तान शाह वली ऊरुस उत्सव संपन्न…

दानापूर – गोपाल विरघट

दानापूर येथील मस्तान शाहा वली दरगाह मध्ये 200 ते 250 वर्षांची परंपरा कायम 2दिवसीय कार्यक्रम संपन्न झाला असून दर्गाहाचे खादीम यांच्या निवासस्थानून बुधवार दिनांक 24 4 2023 रोजी फुलांची चादर गलेप चढवण्यात आले दुसऱ्या दिवशी टिपू सुलतान ग्रुपच्या वतीने अफसर खान उर्फ बब्बू खान यांच्या निवासस्थानून मस्तान शहा दरगाह दरगाह पर्यंत संदलची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणूक मध्ये हजारो हिंदू मुस्लिम बांधवांनी सहभाग दर्शवला. तसेच हजरत मस्तान शाहा वली दरगाहा हे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानले जाते. या उत्साहाला अनेक वर्षाची परंपरा कायम असून या उत्साहासाठी मोठ्या संख्येने पाहुणे गोळा होतात व संदलच्या मिरवणुकीत सहभाग दर्शवतात तसेच सायंकाळी मानलेल्या मन्नत उतरवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच रात्री दहा वाजता टिपु सुल्तान गुप च्या वतीने फुलांची चादर गलेप चढून प्रार्थना केली.

या कार्यक्रमाला हिवरखेड येथील ठाणेदार चव्हाण साहेब,गवळी,साबळे,गवई ,सोळंखे,यांनी आपल्या ताब्यासह चोख बंदोबस्त ठेवला. तसेच गावातील पोलीस पाटील संतोष माकोडे , तंटामुक्ती अध्यक्ष राजू उंबरकर, पंचायत समिती सदस्य संदीप पालीवाल, उपसरपंच सागर ढगे, सरपंच पती धम्मपाल वाकोडे, पत्रकार गोपाल विरघट,

शे. राजु शे. नबी. नंदकिशोर नागपुरे,मस्तान शाहावली दरगाहाचे खादीम उस्मान शाहा, शेरू शाहा, मोबिन शाहा, अनवर शाहा, शकील शाहा, तसेच टिपू सुलतान ग्रुपचे फिरोज खान, असलम खान, जावेद सौदागर,अतहर सौदागर, शेख सलीम,राजीक सैदागर, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: