रामटेक – राजु कापसे
महाराष्ट्र शासन, महसुल व वन विभाग, शासन निर्णय दिनांक 30/7/2024 अन्वये दिनांक 1 ऑगष्ट 2024 ते 15 ऑगष्ट 2024 या कालावधीत महसुल पंधरवडा साजरा करण्याबाबत निर्देश आहेत. त्या अनुषंगाने 8 ऑगष्ट 2024 रोजी तहसिल कार्यालय रामटेक येथे “ महसुल जन संवाद “ तहसिल कार्यालय रामटेक येथे महसुल अदालत व फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले. सदर फेरफार अदालत मधे प्रलंबित फेरफार निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात आली. तसेच प्रलंबित महसुल प्रकणे, सलोखा योजना अंतर्गत प्रलंबित प्रकरणे, वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रुपांतरण करण्याची प्रकरणे निकाली काढण्यात आली.
तसेच दिनांक 9 ऑगष्ट 2024 रोजी “ महसुल ई प्रणाली “ कार्यक्रमा अंतर्गत तहसिल कार्यालय रामटेक येथे ई पंचनामे करण्याबाबत सर्व तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्यात आले. तसेच – ई चावडी- अचुक जमीन महसुल मागणी निश्चित करणे व ऑनलाईन जमीन महसुल भरणे इत्यादीबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने सर्व तलाठयांना मार्गदर्शन करण्यात आले.
त्यावेळी मा रमेश कोळपे, तहसिलदार रामटेक यांनी ई पंचनामे अचुक पध्दतीने करण्याबाबत सविस्तर व ई चावडी अंतर्गत जमीन महसुलाची मागणी निश्चिती करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अंतर्गत नावामध्ये हस्तदोष/ तांत्रीक दोष बाबत कार्यवाहीच्या अनुषंगाने माहिती देण्यात आली. ई फेरफार बाबत प्राप्त तक्रारी विहित मुदतीत निकाली काढणे, ई हक्क प्रणाली, महसुल विभागाच्या उपलब्ध ऑनलाईन सुविधा इत्यादीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.
आपले सरकार पोर्टल वर प्राप्त होणा-या तक्रारीचे निराकरण करण्यात आले. सदर कार्यक्रमांत श्री. योगेश राऊत, तालुका कृषी अधिकारी रामटेक, श्री. भोजराज बडवाईक नायब तहसिलदार रामटेक, श्रीमती सारीका धा्त्रक नायब तहसिलदार रामटेक, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक उपस्थित होते.