Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsशहीद कॅप्टन शुभम गुप्ताच्या आईचे अश्रू अनावर आणि राजकीय पुढाऱ्यांचे चेक घेवून...

शहीद कॅप्टन शुभम गुप्ताच्या आईचे अश्रू अनावर आणि राजकीय पुढाऱ्यांचे चेक घेवून फोटोसेशन…

आग्रा येथील 27 वर्षीय सुपुत्र कॅप्टन शुभम गुप्ता यांनी जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे दहशतवाद्यांशी लढताना सर्वोच्च बलिदान दिले आहे. कॅप्टन शुभम गुप्ताच्या शहीद झाल्याची बातमी घरी पोहोचताच कुटुंबावर शोककळा पसरली. शहीदांचे वडील बसंत गुप्ता यांची प्रकृती वाईट असून ते रडत आहेत. मुलगा शुभमचे सैन्यातील सहकारी परिवाराला भेटायला येताच आई वडील मिठी मारून रडतात असा भावूक क्षण असतांना राजकीय पुढारी अश्यावेळेस शहीद परिवारासोबत फोटोसेशन करतात. यावर शुभमच्या आईने फोटोसेशन करणाऱ्या नेत्यांना जे सुनवले ते ऐकून पायाखालीची जमीन सरकेल.

योगी सरकारचे मंत्री योगेंद्र उपाध्याय हे शहीद कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या घरी ५० लाख रुपयांचा धनादेश घेऊन पोहोचले होते. यावेळी चेक देतांना मंत्री महोदयानी फोटो सेशन सुरु केले हे पाहून हुतात्माच्या आईला अश्रू अनावर झाले आणि रडताना म्हणाल्या ‘इथे प्रदर्शन लावू नका, माझा मुलगा शुभमला घेऊन या’ यावर विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षांना चांगलेच सुनावले आहे.

कॅप्टन शुभमचे वडील बसंत गुप्ता सांगतात की, दोन दिवसांपूर्वी त्यांचे मुलाशी फोनवर बोलणे झाले होते. त्यावेळी त्यांनी काही काम बाकी असून ते पूर्ण करून लवकरच परतणार असल्याचे सांगितले होते. दोनच दिवसांनी तो रजेवर घरी येणार होता. गेले 15 दिवस मी फक्त एक काम आहे आणि ते करणार आहे असे सांगत होता. मात्र आता त्यांच्या हौतात्म्याची बातमी आली आहे.

समाजवादी पक्षाने x वर व्हिडिओ पोस्ट करीत लिहले…भाजप सदस्यांच्या असंवेदनशीलतेवर एक आई म्हणाली, ‘हे प्रदर्शन लावू नका भाऊ’! काल शहीद झालेल्या आग्रा येथील कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या कुटुंबीयांना धनादेश देण्याच्या नावाखाली भाजप सरकारचे मंत्री फोटोशूट करत आहेत, हा रडणाऱ्या आईच्या अश्रूंचा अपमान आहे.

शहीदांच्या नावावरही भाजपवाले राजकारण करणे सोडले नाही, हे लाजिरवाणे आहे…शहीद कुटुंबाचा अपमान केल्याबद्दल मंत्र्यांनी माफी मागावी…

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: