Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीविवाहीत युवकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या...

विवाहीत युवकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या…

पातुर तालुक्यातील उमरा येथील घटना…

पातुर – निशांत गवई

पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत उमरा येथे आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने विवाहीत युवकाने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 21 जून रोजी सकाळी उघडकीस आली.गजानन दगडू सपकाळ (35 ) असे मृत विवाहीत युवकांचे नाव आहे. मृतक हा आपल्या घरात रात्री एकटाच झोपला होता.

मात्र दि. मंगळवारी २० जूनच्या रात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरिय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविले पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्याच्या पश्चात पत्नी दोन मुली आहेत.नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार सासू व पत्नीच्या कारणा वरून आत्महत्या केली गेली असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पुढील तपास चान्नी पोलीस करित आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: