रामटेक – राजू कापसे
दि. १८ सप्टेंबर ला औधोगिक प्रशिक्षण संस्था, रामटेक येथे दिक्षांत समारोह साजरा करण्यात आला. तसेच मॅराथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.औ.प्र.संस्था रामटेक व नागपूर विभागातुन प्रथम क्रमांक पटकविणारे अविनाश बरबटे वायरमन ट्रेड मध्ये ९६.१७ % व रोहीदास गडे टर्नर ट्रेड ९६.१७ मिळविणारे यांचा रामटेक पंचायत समितीचे माजी उपसभापती उदयसिंह (गज्जु) यादव यांचे हस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देवुन सत्कार करण्यात आला.
द्वितीय क्रमांक आदित्य राऊत ९६% तसेच तृतीय क्रमांक वैभवी सहारे ९५.५० ईक्टीशियन ट्रेड मध्ये सर्व मुलीमध्ये प्रथम आली यांचा सुध्दा प्रमुख पाहुण्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. दि.१७ सप्टेंबर ला मॅराथान स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक पटकविणार्या प्रशिक्षणार्थाना महिला व पुरुष गटामध्ये ३०००,२०००,१०००, रुपये असे प्रत्येकी पारितोषिक व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देवुन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आय.टी.आय चे प्राचार्य श्रिमती वैशाली कुंभले,रामटेक पंचायत समितीचे माजी उपसभापती उदयसिंह यादव,रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रणविर यादव,नगरधन माजी उपसरपंच चंद्रकात नंदनवार, बबलु यादव प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला संस्थेचे गटनिर्देशक अमीन सर,धारपुरे सर, सिंदे सर व निदेशक वृंद ,मदनकर सर,साठवने सर,खोब्रागडे सर,बावणे सर,बेंबळगे सर, प्रशिक्षणार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.गुणवंत विद्यार्थांनी आपले मनोगत व्यक्त करुण यशाची पायरी सांगीतली.कार्यक्रमांचे सुत्रसंचालन कू. रोशनी गजभिये यांनी केले.तर कु. स्वाती खोब्रागडे यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.