मूर्तिजापूर – मराठा सेवा संघाचा ३३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष गजानन बोर्डे पाटील होते. जेष्ठ मार्गदर्शक अशोकराव मोरे, योगेश भडांगे संभाजी ब्रिगेडचे अमरावती विभागिय अध्यक्ष संजीव गुप्ता, तालुका अध्यक्ष उज्वल ठाकरे उपस्थित होते.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून तालुका शाखेचे वतीने मुर्तिजापूर येथील महात्मा ज्योतिबा फुले वृद्धाश्रम आणि श्री.छत्रपती शिवाजी महाराज वृद्धाश्रम,शिवराणा गड, पुंडलीक नगर येथिल वृद्धांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रा. प्रमोद ठाकरे यांनी सेवा संघाचे स्थापने पासून सेवा संघाच्या विविध कार्य, ध्येय, उद्धिष्टे, भूमिका स्पष्ट केली.
१ सप्टेंबर १९९० रोजी अकोला येथे संस्थापक अध्यक्ष मा. अँडव्हकेट पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांचे अध्यक्षतेखाली मराठा सेवा संघाची स्थापना झाली.अतिशय कमी कालावधीत सेवा संघाचे विशाल वटवृक्षामध्ये रूपांतर झाले.आज महाराष्ट्रासह भरतात विविध ठिकाणी आणि भारताचे बाहेर सुद्धा मराठा सेवा संघ कार्यरत आहे.
मराठा सेवा संघाचे आज एकूण ३२ कक्ष कार्यरत आहे.एकाच ध्यास-बहुजन विकास याची कास धरून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ३३ वर्षापासून सेवा संघाचे अविरत कार्य सुरू आहे.महापुरुषांचे विचार अंगीकारून ते बहुजन लोकांपर्यंत पोहचविणे,धार्मिक सहिष्णुता, जातीय सलोखा, बहुजनची शैक्षणिक,सामाजिक, आर्थिक विकास,
अंधश्रद्धा निर्मूलन, चुकीच्या वाईट प्रथा परंपरेला विरोध, वैज्ञानिक दृष्टिकोन, महिलांची प्रगती, समाजाची सांस्कृतिक प्रगती, निर्भेड विवेकवादी समाजपयोगी युवक घडावा यासाठी मार्गदर्शन, इत्यादी क्षेत्रात मराठा सेवा संघाने विशेष कामगिरी केली आहे.कार्यक्रमामध्ये मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये पवन तळोकार,प्रवीण नवले, विकास लकडे,निखिल किर्दक, हितेश ठाकरे,पियुष गावंडे,सौरभ कांबे,शैलेश काळे,मयूर गावंडे, वैभव वानखेडे,पंकज नवले,आकाश गायकवाड, हर्षल जाधव ईत्यादींची उपस्थिती होती.