सांगली – ज्योती मोरे
दि – 02/11/2023 मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तसंच मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज मिरज तालुक्यातील मानमोडी गावच्या सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्यायत.
यामध्ये सरपंच स्वागत साळुंखे, उपसरपंच आशुतोष देसाई, पोलीस पाटील, पंकज पाटील ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र साळुंखे, अर्जुन चव्हाण दत्तात्रय साळुंखे महादेव घोरपडे, अक्षय साळुंखे आदी मान्यवरांसह मराठा बांधव सहभागी झाले होते.